आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️इरई धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू..

▪️प्रशासनाचा सतर्कतेचे आवाहन..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : इरई धरणाची पातळी आज २०७.३२५ मीटर वर पोहोचली आहे. त्यामुळे आज सकाळी ०७:३० वाजता धरणाचे ३ दरवाजे प्रत्येकी ०.२५ मीटर ने उघडण्यात आले. या निर्णयामुळे इरई नदीपात्रात पाण्याचा विसर्ग वाढला असून, खालच्या प्रवाहातील गावांमध्ये पूरस्थितीची शक्यता वर्तवण्यात येत आहे. या पाणी विसर्गाचा फटका पद्मापूर, किटाळी, मासाळा, पडोली, यशवंतनगर, दाताला, आरवट, नांदगाव पोडे, भटाळी, वडोळी, चिचेली, कढोळी, पायली, खैरगाव, चांदसूरला, विचोडा बुजुर्ग, आंभोरा, लखमापूर, कोसारा, खुटाळा हडस्ती, चारवट, कवटी, चेक तिरवंजा, देवाळा, चोराळा, हिंगणाळा, चिंचोली, मिनगाव, वडगाव, चंद्रपूर, माना आणि इतर नदीकाठच्या गावांना बसू शकतो.
प्रशासनाच्या वतीने नागरिकांना सूचना नदीकाठच्या भागात जाणे टाळावे. शेतकरी व पशुपालकांनी जनावरे सुरक्षित स्थळी हलवावीत.पूरस्थिती उद्भवल्यास तात्काळ स्थानिक प्रशासनाशी संपर्क साधावा.
दरम्यान, चंद्रपूर जिल्हा प्रशासनाने सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि सुरक्षिततेसाठी आवश्यक ती काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.