आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

◼️नवरगावात मालवाहु ई- रिक्षाच्या धडकेत अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू…..

 

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी

सिंदेवाही (इंडिया २४ न्युज ) दि.१९ जूलै
सिंदेवाही तालुक्यातील नवरगाव येथील महादेव मोहल्यात रविवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी अपघातात अडीच वर्षीय चिमुरडीचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून गावात शोककळा पसरली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महेश गहाणे यांची अडीच वर्षीय मुलगी श्रीजा महेश गहाणे ही घरासमोर खेळत होती. त्यावेळी ती वडीलाकडे जात असताना भरधाव वेगाने येणाऱ्या साबणाच्या मालाने भरलेल्या मालवाहू ई-रिक्षाने चालकाचे नियंत्रण सुटल्याने तिला धडक दिली. या अपघातात श्रीजाचा जागीच मृत्यू झाला. वडीलांच्या डोळ्यासमोर घडलेल्या या घटनेने कुटुंबीयावर दुःखाचा डोंगर कोसळला.

हा अपघात रविवारी ( दि. १९ जुलै) सकाळी सुमारे ११. ३० वाजताच्या सुमारास घडला. घटनेनंतर परिसरात संतापाची लाट उसळली.

या प्रकरणी मालवाहू ई- रिक्षाचा चालक प्रेम नारायण चहांदे (रा. लाडबोरी) याला सिंदेवाही पोलीसांनी ताब्यात घेतले असुन, पुढील तपास सिंदेवाही पोलीस करीत आहेत.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.