आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महानगरपालिका चंद्रपूर मा. आयुक्त यांना दिले पाणी टंचाई बाबत निवेदन : नगरसेविका सौ. सोनियाताई उंदिरवाडे, बहुजन समाज पार्टी, चंद्रपूर

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो

नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : प्रभाग क्र. १३, बाबानगर, बाबूपेठ तसेच जटपूरा प्रभाग क्र. ७, जलनगर वॉर्ड येथे निर्माण झालेल्या तीव्र पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर बहुजन समाज पार्टीच्या वतीने मा. आयुक्त, चंद्रपूर महानगरपालिका यांना निवेदन सादर करण्यात आले.
सदर निवेदन प्रभाग क्र. १३ च्या नगरसेविका सौ. सोनियाताई उंदिरवाडे (बहुजन समाज पार्टी) यांच्या नेतृत्वाखाली देण्यात आले. निवेदनामध्ये नमूद केल्याप्रमाणे, संबंधित भागात सध्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा अपुरा होत असून पाणीपुरवठ्याचा व्हॉल्व्ह पूर्ण क्षमतेने (फुल व्हॉल्व्ह) उघडला जात नसल्यामुळे नागरिकांना पुरेशा प्रमाणात पाणी मिळत नाही. परिणामी नागरिकांना दैनंदिन जीवनात मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे.
येत्या उन्हाळ्यात पाणीटंचाईची समस्या अधिक तीव्र होण्याची शक्यता लक्षात घेता, संबंधित भागात नियमित पाणी टँकर उपलब्ध करून देण्यात यावेत तसेच पाणीपुरवठा पूर्ण दाबाने व सुरळीत करण्यात यावा, अशी मागणी करण्यात आली आहे. याबाबत तातडीने आवश्यक उपाययोजना करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी विनंती प्रशासनाकडे करण्यात आली आहे.
निवेदन सादर करताना खालील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. पूजा रत्नपारखी, प्रशांत उंदिरवाडे, किशोर चिकाटे, विमित कोसे, विवेक दुपारे, प्रणित तोडे, प्रमोद अलोने, विशाल भैस, हर्षल मोहुरले व संदीप मेश्राम.
बहुजन समाज पार्टीच्या वतीने प्रशासनाने या गंभीर विषयाकडे सहानुभूतीपूर्वक व तातडीने लक्ष देऊन योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.