आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीतीत विष प्राशन करून केलेल्या आत्महत्या प्रकरणी केलेला तपासाबाबत..

 

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीत एका इसमाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन आणि मृतकास योग्य न्याय मिळावा या उ‌द्देशाने, चंद्रपूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक यांनी दखल घेत संपूर्ण कायदेशीर प्रक्रिया अत्यंत पारदर्शक पद्धतीने राबविण्याचे निर्देश दिले आहेत.

पारदर्शकतेसाठी पोलीस प्रशासनाकडून घेण्यात आलेले तातडीचे निर्णयः

विशेष दंडाधिकाऱ्यांमार्फत इनक्वेस्ट पंचनामाः तपासात संपूर्ण निष्पक्षता राहावी यासाठी मा. न्यायालयीन प्रक्रिये नूसार मृतक इसमाचा ‘इनक्वेस्ट पंचनामा स्वतः विशेष दंडाधिकारी यांच्या उपस्थितीत व देखरेखीखाली कायदेशीररीत्या पूर्ण करण्यात आला आहे.

वैद्यकीय चमूद्वारे (Medical Board) शवविच्छेदनः मृत्यूचे अचूक व तांत्रिक कारण समोर यावे यासाठी मृतदेहाचे शवविच्छेदन (Post-Mortem) तज्ज्ञ वैद्यकीय चमूद्वारे (Medical Team) करण्यात आले आहे. या संपूर्ण प्रक्रियेत पूर्ण पारदर्शकता ठेवण्यात आली आहे.

तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) वर्गः सदर प्रकरणाचा सखोल, निष्पक्ष आणि उच्चस्तरीय तपास व्हावा, या दृष्टीने पोलीस अधीक्षक यांच्या शिफारसी वरुन या प्रकरणाचा पुढील तपास आता राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडे (CID) सोपविण्यात आला असुन पुढील तपास राज्य गुन्हे अन्वेषण विभाग करीत आहे.

सदर प्रकरणाचा कायदेशीर तपास प्रक्रिया सखोल आणि पारदर्शक पद्धतीने करण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.