▪️नीट (NEET) चा पेपर फुटला, लाखो परीक्षार्थ्यांचे नुकसान झाल्यामुळे केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : शहर राष्ट्रवादी काँग्रेस व जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने नीट (NEET) चा पेपर फुटला, लाखो परीक्षार्थ्यांचे नुकसान झाले, विद्यार्थी नैराश्याच्या खाईत गेले आणि तब्बल २१ भावी डॉक्टरांनी आपले आयुष्य संपवले. या गोष्टीची नैतिक जबाबदारी घेणे तर दूरच, पण एनडीए सरकारने आणि प्रशासनाने विद्यार्थ्यांच्या हक्कांसाठी जंतर-मंतरवर उपोषण करणारे शिक्षणतज्ज्ञ आणि पर्यावरणवादी सोनम वांगचुक तसेच अन्यायग्रस्त विद्यार्थ्यांना जी वागणूक दिली, ती एखाद्या हुकूमशाहीलाही लाजवणारी आहे.
विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळणाऱ्या, त्यांच्या न्यायाच्या लढ्याला दडपून टाकणाऱ्या आणि त्यांच्या मागण्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करणाऱ्या निष्ठुर, बेजबाबदार व असंवेदनशील ‘एनडीए’ सरकारच्या निषेधार्थ तसेच विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ चंद्रपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेस ,जिल्हा युवक राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यावतीने शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके युवक जिल्हध्यक्ष रोशन कोरेडडीवर यांच्या नेतृत्वात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धन्मेंद्र प्राधान राजेंनामा दया सरकार हमसे डरती है पोलीस को आगे करती है नारेबाजी करत केंद्र सरकारचा तीव्र शब्दांत निषेध करत व सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला .
बेबीताई उईके म्हणाल्या संविधान, लोकशाही आणी अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या रक्षणासाठी आमचा लढा कायम सुरूच राहील हा निर्धार यावेळी करण्यात आला
यावेळी आंदोलनात उपस्थित शहर जिल्हाध्यक्ष बेबीताई उईके. प्रदेशसरचिटणीस हिराचंद बोरकुटे युवक जिल्हाध्यक्ष रोशन कोरेडडीवर माजी गट नेते संजय वैद्य विधानसभा अध्यक्ष सूरज चव्हाण नगर नगरसेवक फय्याज शेख
आदिवासी सेल. जनार्धन गेडाम, कामगार शहर अध्यक्ष महेश काहीलकर, विध्यार्थी शहर अध्यक्ष परब गिरडकर, उपाध्यक्ष शरद मानकर उपाध्यक्ष दिपक कटकोजवार, सरचिटणीस अरविंद परचाके अनुप बेले. मनीष मोडक किशोर शेडमाके अनिल मन्ने गजानन राऊत, वामन वाडगुरे रुपेश मुलकावर सचिन काकडे सुभाष नंन्नावरे पदाधिकारी कार्यकर्ते युवक विध्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होतेपक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी व नागरिक उपस्थित होते.



