आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️सोमनाथ येथील आमटे फार्म येथे वाघाच्या हल्यात मारोडा येथील महिला ठार..

▪️ग्रामस्थांमध्ये प्रचंड रोष, वनाधिकाऱ्यांची मनधरणी..

 

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७

मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : सोमनाथ येथील आमटे फार्ममध्ये कापूस तोडण्यासाठी गेलेल्या मारोडा येथील एका महिलेला वाघाने ठार केल्याची दुर्दैवी घटना आज घडली. सुनीता शामराव भोयर (वय ४५, रा. मारोडा) असे मृत महिलेचे नाव आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सुनीता भोयर या महिला सकाळी इतर मजुरांसह शेतात कापूस तोडण्यासाठी गेल्या होत्या. शेताच्या कडेला असलेल्या झुडपातून अचानक वाघाने हल्ला केला. इतर मजुरांनी आरडाओरडा केल्यावर वाघ जंगलाच्या दिशेने पसार झाला; मात्र तोपर्यंत सुनीता भोयर यांचा जागीच मृत्यू झाला होता.

घटनेची माहिती मिळताच वनविभाग व पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून नागरिकांनी वनविभागाकडे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे.

मृत महिलेच्या पश्चात म्हातारे आई वडील कुटुंबीय असा बराच मोठा परिवार आहे. शासनाकडून आर्थिक मदतीची मागणी ग्रामस्थांनी केली आहे. पुढील तपास वनविभागाकडून सुरु आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.