▪️चंद्रपूरमध्ये एनडोमेट्रीओसिस ( गर्भाशयाचा अस्तराची सूज )जागरूकता दिन कार्यक्रम संपन्न..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : फेडरेशन ऑफ ऑब्स्ट्रेटिक्स ॲन्ड गायनाकॉलॉजिस्ट सोसायटी च्या निर्देशानुसार ,चंद्रपूर प्रसूती व स्त्री रोग तज्ञ संघटना द्वारे आयोजित एडोमेट्रीओसिस जागरूकता महिना , कार्यक्रम यशस्वीरीत्या संपन्न झाला. या कार्यक्रमात 200 पेक्षा अधिक सहभागी, नर्सिंग विद्यार्थी, वैद्यकीय पेशेवर आणि समुदायातील सदस्यांनी भाग घेतला.
कार्यक्रमाची सुरुवात वृक्षारोपण समारंभाने झाली. डॉ. आशिष झरारीया यांनी एडोमेट्रीओसिसबद्दल जागरूकता वाढवण्याबद्दल माहिती दिली. रांगोळी स्पर्धा, स्लोगन स्पर्धा आणि रॅली यांचा समावेश होता.
चंद्रपूर प्रसूती व स्त्री रोग तज्ञ संघटना च्या अध्यक्षा डॉ. कल्पना गुलवाडे, सचिव डॉ. रुचा पोडे, कोषाध्यक्ष डॉ. स्वेता मानवटकर, डॉ. मनीषा घाटे, डॉ. असावरी देवताळे, डॉ. अपर्णा देवईकर, डॉ. दीपाली मुसळे, डॉ. पल्लवी अल्लुरवार, डॉ. राधिका भोगावार, आणि डॉ. प्राची पितलवार यांच्या प्रयत्नांना यश आले.
मानवटकर नर्सिंग कॉलेज आणि
स्व. वसुधा झाडे नर्सिंग कॉलेजच्या विद्यार्थी व विद्यार्थिनी आणि अध्यापकांचे विशेष आभार.
समाजातील सर्व महिला घटकांना आवाहन करण्यासाठी व लपलेला आजाराचे लवकर निदान करून बरा करण्यासाठी हा जनजागृती पर कार्यक्रम घेण्यात आला .
अतिशय वेदनादायक मासिक पाळी व इतर गंभीर समस्यांसाठी वेळेच्या आत स्त्री रोग तज्ञ डॉक्टरांना त्वरित संपर्क करावा असे आवाहन या निमित्ताने करण्यात आले.
जीवनशैली, खानपान, व्यायाम, व आजाराबद्दल जागरूकता,प्रत्येक घरातील प्रत्येक महिलां पर्यंत पोहोचविण्याचे ध्येय हया कार्यक्रमाच्या माध्यमातून पूर्ण करण्याचा हा प्रयत्न निरंतर सुरु असून तो संपूर्ण महिलांना सशक्त, निरोगी व सबळ बनविण्याचा उत्तम प्रयत्न आहे असे डॉ कल्पना गुलवाडे यांनी स्पष्ट केले.



