आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर परिमंडळात महिला दिनाचा उत्साह; कर्तुत्ववान महिला अभियंता व कर्मचाऱ्यांचा गौरव..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : 11 मार्च 2026:- महिला दिनानिमित्त महिलांच्या संघर्षाचा सन्मान आणि त्यांच्या कार्यातील कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी महावितरणच्या चंद्रपूर मंडळाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. वीज क्षेत्रासारख्या आव्हानात्मक आणि तांत्रिक कामातही महिलांनी आपल्या कार्य कुशलतेचा ठसा उमटवला असून त्यांच्या या कर्तुत्वाचे दर्शन या विशेष कार्यक्रमात घडले.
चंद्रपूर परिमंडळ येथे पार पडलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्य अभियंता, श्री. हरीश गजबे, चंद्रपूर परिमंडळ होते. तसेच चंद्रपूर मंडळाच्या अधिक्षक अभियंता, श्रीमती संध्या चिवंडे, अधीक्षक अभियंता (पा.आ.), श्री. रमेश सानप, चंद्रपूर परिमंडळ. श्री. चंद्रशेखर दरव्हेकर, कार्यकारी अभियंता, चंद्रपूर विभाग, श्री. योगेंद्र निचत, कार्यकारी अभियंता, चाचणी विभाग चंद्रपूर, डॉ. श्री. अविनाश आचार्य, वरिष्ठ व्यवस्थापक (मा.सं), चंद्रपूर परिमंडळ, श्री. राकेश बोरीवार, वरिष्ठ, व्यवस्थापक (विवले), चंद्रपूर मंडळ, यांची प्रमुख उपस्थिती होती. चंद्रपूर परिमंडळातील महिला अभियंता अधिकारी, कर्मचारी तसेच शिकाऊ उमेदवारांचा गुलाब पुष्प व भेटवस्तू देऊन विशेष सत्कार करण्यात आला. यावेळी सहभागी महिलांनी महावितरण मध्ये काम करत असताना आलेले अनुभव मनोगताच्या माध्यमातून व्यक्त केले. आणि प्रमुख वक्ते म्हणून डॉ. अविनाश आचार्य यांनी कार्यक्रमात प्रेरणादायी भाषण दिले. तसेच अध्यक्षीय भाषणातून मुख्य अभियंता, श्री. हरीश गजबे यांनी उपस्थित सर्व महिलांना मार्गदर्शन केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.