ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️नियमांचे उल्लंघन करून, आरओ (RO) प्लांट सुरू ?

▪️पाण्याची गुणवत्ताची चाचणी नसल्याने जनतेचे आरोग्य धोक्यात..!

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

नागभिड – ( इंडिया 24 न्युज ) : प्रत्येकाला शुद्ध पाणी पिण्याची इच्छा असल्याने हा आरओ वॉटर सप्लाय व्यवसाय एक सदाहरित व्यवसाय बनला आहे. नियमित पाण्याची गुणवत्ता चाचणी (TDS पातळी) करणे बंधनकारक आहे. नियमांचे पालन करूनच आरओ प्लांटचा कायदेशीर व्यवसाय सुरू करता येतो. पण तालुक्यात अनेक व्यावसायिक प्राधिकरणाच्या विना परवानगीने व पाण्याची चाचणी न करता जनतेच्या जीवाशी खेळ सुरू आहे.

महाराष्‍ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ तथा अन्न व औषधी प्रशासनाची परवानगी घेऊनच आरो प्लान्ट सुरू करता येते. परंतू जल प्रदुषण अधिनियम 1974 व वायू प्रदुषण अधिनियम 1981 अन्‍वये पिण्‍याचे थंड पाणी कॅन-जार मध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग बेकायदेशीरपणे तालुक्यातील नागभिड शहरात व ग्रामीण भागात सुरू आहे. यामध्ये पिण्‍याचे थंड पाणी कॅन, जारमध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग, व्‍यवसायामुळे पुरवठा होणारे पाणी मनुष्‍याचे आरोग्‍यास अपायकारक ठरत आहे.

परवाना व माणके : व्यवसायिक आरओ (RO) प्लांट सुरू करण्यासाठी तीन मुख्य विभागांची परवानगी आणि शासकीय नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. यामध्ये प्रामुख्याने ग्रामपंचायत/नगरपालिका एनओसी, भूजल सर्वेक्षण विभागाचा परवाना (बोअरवेलसाठी) आणि अन्न सुरक्षा व मानके प्राधिकरण (FSSAI) नोंदणी आवश्यक आहे, ज्यामुळे पाणी पुरवठा कायदेशीर आणि सुरक्षित राहील.
नागभिड परिसरात पिण्‍याचे थंड पाणी कॅन, जारमध्‍ये विक्रीकरीता निर्माण करणारे उद्योग बेकायदेशीर व नियमांच खुलेआम उल्लंघन करूनही सुरू असल्याचे दिसून येत आहे. स्थानिक पातळीवर कोणत्याही प्रकारच्या कारवाई होत नसल्याने सर्रासपने नागरिकांच्या आरोग्याशी खेळ सुरू आहे. स्थानिक पातळीवरिल प्रशासनाकडून कोणत्याही प्रकारची कारवाई होत नसल्याने भविष्यात जनतेचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही.
तालुक्यातील ग्रामीण भागात सुध्दा बेकायदेशीर आरओ उद्योग सुरू आहेत.नागभिड शहरात १० ते १२ आरओ प्लांट असून, कुणीही कायदेशीर कारवाई पूर्ण केली नसल्याचे सांगण्यात येत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.