◼️ कच्चेपार सफारी गेटमुळे पर्यटनाला चालना

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही: (इंडिया २४ न्यूज) दि.२०/०३/२०२६
ब्रह्मपुरी वन विभागातील सिंदेवाही वनपरिक्षेत्रांतर्गत येणारे कच्चेपार सफारी गेट सध्या पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र बनले आहे. या गेटमधून जंगल सफारी दरम्यान, पर्यटकांना वाघ, बिबटे, अस्वल, रानगवे यासारखे विविध वन्य प्राणी प्रत्यक्ष पाहण्याची संधी मिळत आहे. त्यामुळे पर्यटकांची वर्दळ दिवसेंदिवस वाढत आहे.
जंगलाच्या मध्यभागी वसलेले सिंधबोडी तलाव हे या परिसराचे आणखी एक वैशिष्ट्य आहे. या तलावाजवळ अनेक प्रकारचे पक्षी, मोर, तसेच विविध वन्यप्राणी पाहायला मिळतात. निसर्गरम्य वातावरणात वन्यजीवांचे निरीक्षण करताना पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो.
या परिसरातील घनदाट आणि उभट जंगल रचना पर्यटकांचे विशेष लक्ष वेधून घेते. शांत, हिरवाईने नटलेले हे जंगल पाहून पर्यटकांचे मन प्रसन्न होते. त्यामुळे कच्चेपार सफारी गेट हे निसर्गप्रेमीसाठी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून उदयास येत आहे.



