ताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकीय
▪️28 मार्च रोजी पालकमंत्री चंद्रपुरात..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 27 : राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. अशोक वुईके हे 28 मार्च 2026 रोजी चंद्रपूर जिल्ह्याच्या दौ-यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे.
28 मार्च रोजी सकाळी 8.30 वाजता वन अकादमी येथे राखीव, सकाळी 9.30 वाजता चंद्रपूर येथे इरई नदीतील गाळ काढणे व साफसफाई उपक्रमाच्या शुभारंभप्रसंगी उपस्थिती, दुपारी 12.30 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय येथे विविध विषयांवर आढावा बैठकीस उपस्थिती, दुपारी 3 वाजता वन अकादमी येथे राखीव, सायंकाळी 6.30 वाजता प्रियदर्शिनी सभागृह येथे भारतीय सद्विचार प्रचारक मंडळ तर्फे आयोजित कार्यक्रमास उपस्थिती, रात्री सोयीनुसार यवतमाळकडे प्रयाण.



