▪️चोर शिवनी, हडस्थी परिसरात चोरांचा सुळसुळाट..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पठाणपुरा गेट पासून काही अंतरावर असलेले गाव चोररशिवनी व हडसती या गावात चोरांनी धुमाकूळ घातलेला आहे. चोर शिवनी येथील शेतकरी श्री संतोष पहानपटे व हडसती येथील शेतकरी श्री उमाटे यांच्या शेतातील चालू स्थितीत असलेल्या इलेक्ट्रिक नदीवरील मोटारी रात्रीच्या दरम्यान चोरीला गेल्या त्या संदर्भात शहर पोलीस स्टेशनला तक्रार नमूद केलेली आहे. आधीच शेतकरी हलाखीच्या परिस्थितीत जगत आहे निसर्गाच्या अव कृपेमुळे शेतकरी हवालदिन झालेला आहे.आधीच तो शेतातील उत्पन्न 50% वर आल्यामुळे जीवन जगणे मेटाकुटीस झालेले आहे. त्यावर त्यांच्यावर आलेले अस्मानी संकट त्यात चोरट्यांनी शेतातील चालू इलेक्ट्रिक मोटार चोरून नेल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील रब्बी हंगामातील पिके मुंग, मोट, सोयाबीन, हरभरा, ज्वारी, भाजीपाला लावलेला आहेत ते सर्व पिके वाळू लागलेले आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालेले आहे. आधीच निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतकरी अस्मानी संकटात सापडलेला आहे. त्यात चोरट्यांनी आपला डाव साधून शेतकऱ्यांचे कंबरडेच मोडले शेतकऱ्यांचे जगणे कठीण झालेले आहे. हाता तोंडाशी आलेले पीक डोळ्यादेखत वाळू लागलेले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी कसे जगावे हा प्रश्न पडला आहे. तक्रारीचा शोध आजपर्यंत लागलेला नाही. सदर शेतकऱ्यावर कर्जाचा डोंगर असल्यामुळे तो डबघाईस आलेला आहे. या चोरट्यांच्या पराक्रमामुळे शेतकऱ्यांचे जगणे कठीण मरण स्वस्त झाले आहे असे वाटते.



