▪️पो.स्टे. गडचांदुर हददीत गोवंशाची अमानुष व अवैध वाहतुक करणाऱ्यांविरुध्द मोठी कारवाई..स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची..
▪️एकुण ५२ नग (गौवंशीय) जनावरांची सुटका, ४० लक्ष ४० हजार रु. चा माल जप्त..!

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ०८ एप्रिल, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर च्या पथकाने मिळालेल्या गोपनिय माहितीवरुन पोस्टे गडचांदुर हद्दीत भोयगांव रोडवर नाकाबंदी करुन गोवंश जनावरांची अवैध वाहतुक करणारे ट्रक क्रमांक CG-04-PQ-7579 आणि ट्रक क्रमांक CG-04-PQ-7579 हे दोन्ही जडवाहने पकडुन त्याची पाहणी केली असता सदर दोन्ही ट्रक मध्ये एकुण ५२ नग जनावरे गोवंश (बैल, गाय, गोरे) (त्यातील ३ नग जनावरे मृत) अमानुष रित्या भरुन कत्तलीकरीता नेत असतांना मिळुन आल्याने आरोपी नामे (१) सादीक कुरेशी रा. गडचांदुर व दोन्ही ट्रक चे चालकांविरुध्द पोस्टे गडचांदुर येथे कलम ११(१)(घ) (ड) (च) (ज) प्राण्यांना निर्दयतेने वागणुक प्रतिबंधक कायदा १९६० व कलम ५ (अ),९,११ महाराष्ट्र पशुसंवर्धन कायदा १९७६ सुधारित २०१५ व कलम ३ (५), ४९ भारतीय न्याय संहिता अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असुन पुढील तपास गडचांदुर पोलीस करीत आहे.
सदर गुन्हयात एकुण ५२ नग जनावरे (गोवंशीय बैल) सह दोन ट्रक असा एकुण किं. अं.४०,४०,०००/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी श्री मुम्मका सुदर्शन-पोलीस अधीक्षक चंद्रपूर, श्री ईश्वर कातकडे- अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, सफौ स्वामीदास चालेकर, पोहवा अजय बागेसर, पोहवा किशोर वैरागडे, चापोहवा प्रमोद डंभारे, पोअं/गोपीनाथ नरोटे, चापोअं / वृषभ बारसिंगे सर्व स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांनी केली आहे.



