▪️शेट्टी गँग चा अट्टल गुन्हेगारास ठोकल्या बेड्या पोलीसांना आले यश सावली व मुल परिसरातील २ घरफोडीचे गुन्हे उघड, ११२ ग्रॅम सोने जप्त..
▪️स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर ची कामगिरी..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक ३ एप्रिल, २०२६ रोजी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर आणि पोलीस स्टेशन सावली येथील अधिकारी व अंमलदार यांचे पथकास प्राप्त गोपनिय माहितीनूसार नागपूर येथे जावुन घरफोडी करणारा अट्टल गुन्हेगार शेठ उर्फ रमेश वेलादन शेट्टी रा. चंद्रपूर ह.मु. दिघोरी नागपूर यास ताब्यात घेवुन संयुक्तरित्या तपास केला असता सदर आरोपी याने सावली येथील अपराध क्रमांक १०७/२०२६ कलम ३०५ (अ), ३३१(४) भारतीय न्याय संहिता, पोलीस स्टेशन मुल अपराध क्रमांक २५२/२०२५ कलम ३०५(अ),३३१ (४) भारतीय न्याय संहिता मधील चोरीस गेलेले व सोनाराकडे विक्री केल्याने नागपूर येथील तिन सोनार कडुन सोन्याची दागीन्याची लगड एकुण ११२ ग्रॅम एकुण किंमत १६,८०,०००/- रु. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधिक्षक तथा प्रभारी पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्री अमोल काचोरे, स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर यांचे नेतृत्वात सपोनि श्री दिपक कॉक्रेडवार, सपोनि श्री बलराम झाडोकार, पोउपनि श्री विनोद भुरले, पोउपनि श्री संतोष निंभोरकर, पोउपनि श्री सर्वेश बेलसरे, पोउपनि श्री सचिन मुसळे, सफौ धनराज करकाडे, पोहवा चेतन गज्जलवार, पोहवा सुरेंद्र मंहतो, मोहन दासरवार, पोअं/गोपिनाथ नरोटे, शेखर माथनकर, प्रफुल्ल गारघाटे, अजित शेन्डे, सुमित बरडे, धिरज पिदुरकर, अशोक मडावी, मिलींद टेकाम, गजानन मडावी स्थानिक गुन्हे शाखा चंद्रपूर व पोलीस स्टेशन सावली येथील अधिकारी व अंमलदारांनी संयुक्तरित्या केलेली आहे.



