▪️टेकडा (सिरोंचा) येथे अपघातग्रस्त डोंगरे कुटुंबाला मदतीचा हात!
▪️माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांची सांत्वन भेट.

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : तालुका दौऱ्यावर असतांना अहेरी इस्टेटचे राजे तथा माजी राज्यमंत्री राजे अम्ब्रीशराव महाराज यांना कार्यकर्त्यांमार्फत टेकडा येथील डोंगरे कुटुंबावर ओढवलेल्या अपघाताची माहिती मिळाली.
टेकडा येथील रहिवासी श्री.व्यंकटी लचय्या डोंगरे यांचे दुचाकी अपघाताने दुर्दैवी निधन झाले त्यांच्या पश्चात पत्नी,व 2 मुले असा परिवार आहे.कुटुंबातील कर्ता व्यक्ती गेल्यामुळे डोंगरे कुटुंबावर आर्थिक व मानसिक संकट कोसळले आहे. ही माहिती मिळताच राजे अम्ब्रीशराव महाराजांनी तात्काळ कुटुंबाची भेट घेतली.यावेळी त्यांनी कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना धीर दिला.“आम्ही तुमच्या पाठीशी आहोत,” असा विश्वास देत त्यांनी कुटुंबाला आर्थिक मदत केली.
या प्रसंगी मल्लना संगर्ती,संतोष पडाला,शंकर नरहरी,मधुकर नीलम, तिरुपती जंगा,राजेशम काशेट्टी,राजबापू पोलमपल्ली,श्रीनिवास ओल्लाला,शंकर कवरे,स्वप्नील पेद्दी तसेच स्थानिक कार्यकर्ते व गावकरी उपस्थित होते. या मदतीमुळे स्थानिक नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.


