▪️भानापेठ प्रभागातील त्या रोडचे त्वरित डांबरीकरण करा…! शरद पवार युवती काँग्रेस अध्यक्षा माधुरी कटकोजवार यांची मागणी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : महानगर पालिका क्षेत्रांतर्गत येत असलेल्या भानापेठ प्रभागातील सरदार पटेल महाविद्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारासमोरुन जाणा-या तसेच आय.एम.ए. सभागृह ते जलाराम मंदिर ते गंजवार्ड भाजी मार्केट कडे जाणा-या महत्त्वाच्या रोडवर मधोमध खोदकाम करुन त्यात साधारण मोठ्या आकाराचे काळ्या रंगाचे पाईप टाकून खोदलेला रस्ता माती ओढुन बुजविला परंतु हे काम झाल्यानंतर या रोडवर धुळीचे साम्राज्य निर्माण झालेले आहे. या परीसरात सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, कार्यालयीन कर्मचारी, खाजगी रुग्णालये, गॅस एजन्सी व जलाराम बाबा मंदिरात येणाऱ्या सर्वांना या रस्त्यावर निर्माण झालेल्या धुळीमुळे मोठा त्रास होत असुन श्वसनाचे विकार होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. आधीच चंद्रपूर हे प्रदुषित शहर म्हणून ओळखले जात असतानाच यात अधिकच भर पडल्याचे वाटते. जनतेच्या आरोग्याच्या काळजीपोटी महानगर पालिकेने या रोडचे त्वरीत डांबरीकरण करून जनतेला दिलासा द्यावा. अशी मागणी राष्ट्रवादी युवती काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा माधुरी कटकोजवार (मास्टर ऑफ मास कम्युनिकेशन) यांनी महानगर पालिका आयुक्त माननीय अकुनुरी नरेश , महापौर सौ.संगिताताई खांडेकर , उपमहापौर प्रशांत दानव, स्थायी समिती अध्यक्षा सौ.मनस्वीताई गि-हे व विरोधी पक्षनेते राजेश अडुर आदी मान्यवरांकडे जाहीररीत्या केली असून याबाबत शहर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या जिल्हाध्यक्षा सौ.बेबीताई उईके तथा ग्रामीण जिल्हाध्यक्ष राजेंद्रभाऊ वैद्य यांना माहिती देण्यात आल्याचे कु.माधुरी कटकोजवार यांनी म्हटले आहे.



