आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ईलेक्ट्रीक लोखंडी पोल व पोलवरील अल्यूमिनियम तारांची चोरीचा गुन्हा दाखल दोन आरोपी अटक..

▪️एकूण १०,८४,३७५ /-रू. चा मुद्देमाल जप्त..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

गोंडपिपरी – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक २५/०४/२०२६ ते २६/०४/२०२६ राञौ दरम्यान मौजा सोमनपल्ली ते धाबा रोड वरील इलेक्टीक लोखंडी डिपी पोल क़.104 चा लोखंडी पोल व अल्यूमिनियम तारांची चोरी करण्यासाठी चोरटय़ांनी गॅस कटरने पूर्ण कापुन २५०००/- रू चे नुकसान केल्याचे लेखी तक्रार वरून पोलीस स्टेशन धाबा येथे अप क. ३९/२६ कलम ३०३(१), ६२, ३२४ (४) भारतीय न्याय संहीता २०२३ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला. दि.२६/०४/२०२६ रोजी रात्रो ००:३० वा चे दरम्यान पोलीस स्टेशन धावा येथे कार्यरत रात्रगस्त पोलीस अधिकारी व अंमलदार यांना मौजा सोमनपल्ली धाबा रोडवर धर्मराव भोयर यांचे शेताजवळ संशयीतरित्या एक पांढऱ्या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क MH 34 CQ 2502 मिळुन आल्याने सदर वाहनाची पाहणी केली असता वाहनाच्या कॅबीनमध्ये मोठे हॅड वायर कटर, कापडी हड ग्लोज, एक गॅस कटरला वापरणारी व्हॅर्टीगो गोल्ड २१ केव्ही बॅटरी, हिरव्या रंगाचे मंगलम कॅटऑफ कंपनीचे ०३ कट ऑफ व्हिल, वाहनाचे मागील डाल्यामध्ये जाड दोरखंड रस्सी मिळुन आले. पिकअप वाहनाचे उत्तरेस ७५ मिटर अंतरावर रोडचे पश्चिमेस एका डि.पी.डब्बल पोलजवळ एक काळ्या रंगाची ताडपत्री, एक लाल रंगाचा एच पि गॅस सिलेंडर १५.७ किलो, ऑक्सीजन गॅस सिलेंडर ०२१६ दोन्ही सिलेंडरच्या मुखाला रेग्युलेटर लागलेले असुन त्यामधुन दोन्ही रबरी पाईपचे अंतीम टोकाला लोखंडी गॅस कटर नोझल डिपीचे पोल क डि १०४ चे जवळ पडलेले दिसुन आले. सदर ठिकाणी एक लोखंडी पाना व हातोडी असे मिळून आले. डिपीचे पोल क डि १०४ जमीनीपासुन ०१ फुट उंचीवर पुर्णता कापुन असलेले दिसुन आल्याने वाहन क MH 34 CQ 2502 च्या चालक मालक यांनी चोरी करण्याच्या उद्देशाने सदर पोल कापल्याचे दिसुन आल्याने गुन्ह्याचा तांत्रीक पध्दतीने तपास करुन आरोपीतांचा शोध घेवुन आरोपी (१) मोहम्मद फिरोज अब्दुल वहाब वय ४५ वर्ष धंदा भंगार दुकान रा. हिंदुस्तान भंगार दुकानाजवळ, घुटकाळा तलाव, चंद्रपुर (२) जमील करीम शेख वय ३९ वर्ष रा. रहमतनगर, चंद्रपुर दोन्ही आरोपीतांना दिनांक २७/०४/२०२६ रोजी अटक करण्यात आली आहे.
सदर गुन्हात किं १०,०००,००/- रू एक पांढ-या रंगाची बोलेरो पिकअप वाहन क MH-34/CQ-2502, कि ५०००/-रू निळ्‌या रंगाचा मोठा ईलेक्ट्रीक तार कटर, किं १००/- रू एक कापडी हॅन्डग्लोज, कि ३०००/-रू गैस कटरला वापरणारी एक व्हींगो गोल्ड बॅटरी, किं ७५/- रू हिरव्या रंगाचे मंगलम कंपनीचे ०३ कटऑफ व्हील, किं ५००/- रू एक जाड दोरखंड रस्सी, किं ५,०००/-रू लाल रंगाचे एच पी गॅस सिलेंडर १५.७ किलो व त्यावरील रेग्युलेटर, किं ५००/-रू एक काळ्या रंगाची ताडपत्री, किं ११,०००/-रू ऑक्सीजन गैस सिलेंडर व त्यावरील रेग्युलेटर, किं २०००/-रू दोन रबरी पाईप, कि २०००/-रू एक लोखंडी गैस कटर नोझल, किं १००/-रू एक लोखंडी पाना १२ नंबरचा, किं १०/-रू एक हतोडी, किं. २०,०००/- रू ०३-०४ फुट लांबीचे जंगलेले इलेक्ट्रीक लोखंडी पोलचे ३२ तुकडे, किं. १५,०००/-रू २५ फुट लांबीचे ईलक्ट्रीक अॅल्युमिनीयम ताराचे १० तुकडे, किं. १०,०००/-रू सॅमसंग कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल, किं. १०,०००/-रू रियलमी कंपनीचा अॅन्ड्राईड मोबाईल असा एकूण १०,८४,३७५ /-रू. चा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक श्री मुम्मका सुदर्शन, अपर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधीकारी, राजुरा श्री सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार सपोनी श्री सुबोध वंजारी यांचे नेतृत्वाखाली पोहवा विजय महावी ब न २४१७, पोअ अमीत गुरनुले ब न १३११, पो अं मासुम मेश्राम ब न १६८४, पोअं धनराज सयाम, ब न २८६०, चापोभं रामेश्वर पाल ब न ६०६३, पोअं गजानन तुरेकर ब न १०४, पोअ अमोल कुळमेथे ब न १६४५ सर्व पोलीस स्टेशन धाबा यांनी केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.