▪️मूल तालुक्यात सोमनाथ पर्यटनस्थळाजवळ पतीच्या समोरच वाघाच्या हल्ल्यात विवाहिता ठार..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मो. क्र. ९४०३१७९७२७
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या सीमेवर असलेल्याचंद्रपूर जिल्ह्यातील मुल तालुक्यात वाघाच्या हल्ल्यात एका ५२ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला आहे. ही घटना सोमनाथ पर्यटन स्थळाजवळील बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये घडली.अन्नपूर्णा बिलोणे (५२) आणि त्यांचे पती तुळ सीराम बिलोणे हे बाबा आमटे प्रकल्पाच्या क्वार्टरमध्ये राहत होते. आज पहाटे ४.३० वाजता अन्नपूर्णा त्यांच्या घराच्या अंगणात भांडी घासत होत्या. त्याचवेळी एका वाघाने त्यांच्यावर अचानक हल्ला केला.अन्नपूर्णा यांच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांचे पती तुळशि राम तातडीने बाहेर आले. त्यांनी पाहिले की वाघाने पत्नी अन्नपूर्णा हिच्या गळ्याला पकडले आहे. घाबरून न जाता तुळसीराम यांनी आपल्या पत्नीला वाचवण्यासाठी वाघाशी दोन हात केले. त्यांनी अन्नपूर्णा हिचे पाय धरून त्यांना खेचण्याचा प्रयत्न केला, पण वाघाच्या ताकदीसमोर त्यांचा जोर कमी पडला. शेवटी त्यांनी जवळच पडलेली एक काठी घेऊन वाघावर जोरदार हल्ला केला. या हल्ल्यानंतर वाघ तिथून पळून गेला, पण दुर्दैवाने अन्नपूर्णा यांचा जागीच मृत्यू झाला होता. घटनेची माहिती मिळताच मुल पोलीस आणि वन विभागाचे अधिकारी तातडीने घटनास्थळी पोहोचले. तात्काळ मेजर राष्ट्रपाल कातकर, धनराज नेवारे, वेदनाथ करंबे यांनी घटनास्थळाची पाहणी करून मृतदेह शवविच्छेदनासाठी मुल उप जिल्हा रुग्णालयात पाठवला. वन विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही घटनास्थळी भेट देऊन मृत महिलेच्या पतीला तात्काळ २०,००० रुपयांची मदत दिली.या प्रकरणाचा पुढील तपास उपविभागीय पोलीस अधिकारी सत्यजित आमले यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पोलीस निरीक्षक विजय राठोड यांच्या नेतृत्वाखाली सुरू आहे
या परिसरात वन्य प्राण्यांचे मानवावरील व जनावरांवरील हल्ले वाढले असून या हल्ल्यात अनेक जणांचा बळी गेलेला आहे. तसेच अनेक जनावरे, बकऱ्या वाघाच्या /वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात बळी गेलेले असून कित्येक गंभीर जखमी झालेले आहेत. यावर वन विभागाने तातडीने उपाय योजना करणे गरजेचे आहे.



