ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर पोलीसांची ऐतिहासिक कामगिरी..अवैध वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीच्या आवळया मुसक्या..

▪️गोवंश तस्करांवर जिल्हयातील पहिलीच मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – इंडिया 24 न्युज ) : गोवंश तस्करांवर जिल्हयातील पहिलीच मकोका (MCOCA) अंतर्गत कारवाई ६३ गोवंशाची क्रूरपणे अवैध वाहतूक करणाऱ्या संघटित टोळीच्या आवळया मुसक्या. कुख्यात इमरान बब्बु शेख टोळी विरुध्द मकोका कायद्यान्वये गुन्हा दाखल. चंद्रपूर जिल्ह्यात संघटितपणे अवैध गोवंश तस्करी करणाऱ्या गुन्हेगारी टोळ्यांचे कंबरडे मोडण्यासाठी चंद्रपूर पोलिसांनी आतापर्यंतची सर्वात मोठी आणि ऐतिहासिक पाऊल उचलले आहे. जिल्ह्यातील कुख्यात गोवंश तस्कर इम्रान बब्बु शेख आणि त्याच्या टोळीविरुद्ध अत्यंत कडक मानल्या जाणाऱ्या महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ (MCOCA – मकोका) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गोवंश तस्करी करणाऱ्या टोळीवर मकोका लावण्याची चंद्रपूर जिल्ह्यातील ही पहिलीच धडक कारवाई ठरली आहे.

दिनांक ०६/०४/२०२६ रोजी चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेचे पथक रामनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध जनावरांची वाहतूक, दारूबंदी (प्रोव्हीशन) जुगार रेड, तसेच चोरी व घरफोडीच्या गुन्ह्यांमधील रेकॉर्डवरील आरोपींची तपासणी करण्यासाठी गस्तीवर होते. या दरम्यान, पथकाला खात्रीशीर मुखबिराकडून गुप्त माहिती मिळाली की, मूल ते चंद्रपूर रोडवरून तेलंगणा राज्याकडे दोन मोठ्या ट्रकमध्ये अत्यंत क्रूरपणे जनावरांची अवैध वाहतूक केली जात आहे. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सापळा रचला आणि टाटा कंपनीचे दोन संशयित ट्रक अडवून तपासणी केली. ६३ गोवंशाची निर्दयतेने कोंबून वाहतूक, २ जनावरांचा मृत्युः तपासणी दरम्यान दोन्ही ट्रकमध्ये खालील धक्कादायक बाबी आढळून आल्या. ट्रकमध्ये एकूण ६३ नग गोवंश (गाय-बैल) अत्यंत निर्दयतेने आणि दाटीवाटीने कोंबले होते. जनावरांचे हात, पाय आणि तोंड आखूड दोरीने कचकचून बांधण्यात आले होते. वाहनाच्या डाल्यामध्ये क्षमतेपेक्षा जास्त जनावरे भरलेली असून, त्यांच्यासाठी चारा किंवा पाण्याची कोणतीही व्यवस्था करण्यात आली नव्हती. दोन जनावरे जागीच मरण पावलेल्या स्थितीत आढळली. आरोपींकडे पशुधन विकास अधिकाऱ्यांचे वाहतूक प्रमाणपत्र किंवा आरटीओचा (RTO) जनावरे वाहतूक परवाना, अशी कोणतीही कायदेशीर कागदपत्रे नव्हती. तपासात निष्पन्न झाले की, आरोपींनी संगनमत करून या गोवंशाची कत्तल करण्याच्या उ‌द्देशाने महाराष्ट्रातून तेलंगणा राज्यात अवैध चोरटी वाहतूक चालविली होती. या गुन्ह्यासाठी इतर पाहिजे असलेल्या आरोपींनी अपप्रेरणा दिली होती.
याप्रकरणी फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून रामनगर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ४४१/२०२६ अन्वये खालील कलमांनुसार गुन्हा नोंद करण्यात आला. प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध अधिनियम १९६०: कलम ११(१) (घ) (ङ) (च) (ज), महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम १९७६ (सुधारित २०१५): कलम ५(अ), ५ (ब), ९, भारतीय न्याय संहिता (BNS): कलम ३२५, ३(५), ४९, या गुन्ह्याचा प्राथमिक तपास रामनगर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेंद्र उपरे यांनी केला. जिल्ह्यातील पहिली मकोका कारवाई का ठरली ?

टोळीप्रमुख इम्रान बब्बु शेख व त्याचे साथीदार हे पोलीस अभिलेखावरील सराईत गुन्हेगार आहेत. चंद्रपूर जिल्ह्यात या टोळीविरुद्ध संघटितपणे अवैध गोवंश तस्करीचे एकापेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. या टोळीने वैयक्तिक आणि टोळीच्या माध्यमातून सातत्याने संघटित गुन्हेगारी केल्याचे निष्पन्न झाले असून, माननीय न्यायालयानेही याची दखल घेतली आहे. या संघटित गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी चंद्रपूर पोलीस प्रशासनाने तात्काळ मकोका कारवाईचा प्रस्ताव तयार करून मा. विशेष पोलीस महानिरीक्षक, नागपूर परिक्षेत्र, नागपूर यांचेकडे सादर केला होता. या प्रस्तावाची गांभीर्याने दखल घेत, मा. विशेष पोलीस महानिरीक्षकांनी दिनांक २५/०५/२०२६ रोजी कलम २३(१) (अ) अन्वये या ऐतिहासिक प्रस्तावाला मंजुरी प्रदान केली. त्यानुसार या गुन्ह्यात महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा १९९९ चे कलम ३ (१) (ii), ३(२), ३ (४) ही कडक वाढीव कलमे लावण्यात आली आहेत. गोवंश तस्करांवर मकोका लावण्याची ही चंद्रपूर पोलीस दलाच्या इतिहासातील पहिलीच मोठी कारवाई आहे.

सदर धडक कारवाई पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपानी, अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे, आणि उपविभागीय पोलीस अधिकारी (चंद्रपूर) श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.या कारवाईत खालील अधिकारी व अंमलदारांचा सहभाग होता. पो.नि. श्री. अमोल काचोरे (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर), पो.नि. प्रभावती एकुरके (रामनगर पोलीस स्टेशन), पो.उपनि. सुरेंद्र उपरे (तपास अधिकारी, रामनगर पो.स्टे.), स.फौ. अरुण खारकर (स्थानिक गुन्हे शाखा), पो.हवा. परवरीश शेख (स्थानिक गुन्हे शाखा), पो.हवा. सुधीर मत्ते (स्थानिक गुन्हे शाखा), पो.कॉ. अनिल जमकादम (रामनगर पोलीस स्टेशन), पोलीस प्रशासनाचा कडक इशारा. चंद्रपूर जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची अवैध गोवंश तस्करी किंवा संघटित गुन्हेगारी खपवून घेतली जाणार नाही. अशा गुन्हेगारांवर यापुढेही मकोका सारख्या अत्यंत कठोर काय‌द्यांतर्गत अशीच मोहीम सुरू राहील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.