▪️धान खरेदी केंद्र तात्काळ सुरू करण्यात यावे, अशी मागणी तहसीलदार यांना देण्यात आलेल्या निवेदनातून करण्यात आली..
▪️सिरोंचा तालुक्यातील मेदारम, नारायणपूर, अमरावती, करसपाली व रंगायपली येथील..

*🔸उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
सिरोंचा – ( इंडिया 24 न्युज ) : या निवेदनात शेतकऱ्यांचे धान मोठ्या प्रमाणात तयार असून शासनामार्फत खरेदी केंद्र सुरू न झाल्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे नमूद करण्यात आले. तसेच शेतकऱ्यांना खासगी व्यापाऱ्यांना कमी दरात धान विकावे लागत असल्याने शासनाच्या हमीभावाचा लाभ मिळत नसल्याची खंत व्यक्त करण्यात आली. सदर निवेदनावर माजी उपसरपंच केशव नस्कुरी, वेंकणा भीमकरी, उपसरपंच अशोक हरी, परिसरातील शेतकरी व गावातील नागरिकांनी पाठिंबा दर्शविला. संबंधित गावांमध्ये तात्काळ धान खरेदी केंद्र सुरू करून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी करण्यात आली आहे.
यावेळी रवि बारसागंडी, तालुका सचिव भारतीय कम्युनिस्ट पक्ष (भाकपा) सिरोंचा यांनी प्रशासनाने त्वरित कार्यवाही करावी अन्यथा शेतकऱ्यांच्या वतीने आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही दिला.



