▪️माजरी पाटाळा परिसरात नदीच्या पुराणे व अतिवृष्टीमुळे शेत पिकांचे मोठे नुकसान- शेतकरी हतबल, पुरबुडी व अतिवृष्टीग्रस्त शेतीची पंचनामे कधी?
▪️येलो मोजाक रोगामुळे सोयाबीन पिक धोक्यात.. महसूल विभागाला कधी येणार जाग?

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर
माजरी – ( इंडिया 24 न्युज ) : परिसरातील शेतकरी सद्यस्थितीत आर्थिक संकटात सापडल्याचे दिसून येत आहे . अतिवृष्टी मुळे शिरना नदीला पूर आल्याने सोबतच बुरशीजन्य, करपा येल्लो मोझाक इत्यादी रोगांचा प्रादुर्भाव शेतपिकावर वाढला असून शेतकऱ्यांचे खूप मोठ्याप्रमाणात नुकसान झाले. यातच दोन दिवसापूर्वी माजरी, पाटाळा, पळसगाव, विस्लोन परिसरात ढगफुटी सारखा पाऊस पडल्याने शिरणा नदीला पूर आल्याने नदीकाठची शेती पाण्याखाली आल्याने शेतमालाचे मोठे नुकसान झाले आहे. यामुळे सोयाबीन तसेच कपाशीच्या झाडाची पाने मोठ्या प्रमाणावर झडून या पिकांचे फुटवे सडल्याने झाडांच्या फुल पातीवर, झाडांच्या वाढीवर विपरीत परिणाम झाला आहे. मुसळधार पावसामुळे खोल जागेवरील पिके वाहून गेली तर काही पीक आडवी झोपली आहेत. शिरणानदी व नाल्या लागतच्या शेतात पाणी शिरून पिके सडून गेली.
जिल्ह्यात भद्रावती तालुक्यात पावसाची सर्वात मोठी नोंद झाली असून या पावसामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले असून शेतकऱ्याचे भविष्य अंधारात दिसून येत आहे. मात्र तालुका प्रशासनाकडून अजूनही पंचनामे झाले नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. पुराच्या पावसाने पिके प्रभावीत झाल्याने यावर्षी सोयाबीन व कापूस या पिकांची उतारी कमी होण्याची शक्यता असल्यामुळे शेतकऱ्यांना मोठा आर्थिक फटका बसणार आहे. भद्रावती तालुक्यातील शेतकरी आधीच आर्थिक खर्चाने खचून असून सततच्या आप्पतीमुळे शेतकऱ्याचे कंबरडे मोडले आहे. अशा अवस्थेत शेतकऱ्यांना शासकीय दिलासा मिळणे अपेक्षित आहे. यामुळे शासनाने त्वरित पावले उचलून माजरी, पाटाळा, पळसगाव, विस्लोन परिसरातील प्रभावीत पिकांची पाहणी करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी पळसगाव येथील उपसरपंच श्री. स्वप्नील वासेकर, पाटाळा येथील सरपंच श्री. विजेंद्र वानखेडे, महेश निब्रड,दीपक डाहुले यांनी केली आहे.
वर्जन ( बॉक्स ) ▪️सततच्या अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकावर येलो मोजाक रोगाने पिकाचा अक्षरशः फडशा पाडला आहे. माजरी , पाटाळा , पळसगाव परिसरात ह्या रोगाचा प्रादुर्भाव अधिक गंभीर प्रमाणात दिसून येत असून हातात आलेलं सोयाबीन पिक जागच्या जागी पिवळे पडून सुकत असल्याने शेतकऱ्यांच्या हातचे पिक डोळ्यासमोर नष्ट होत आहे. अशावेळी शासनाने शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष नकरता तात्काळ पंचनामा करून मदतीचे हात पुढे करणे अपेक्षित आहे. अन्यथा नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसह नुकसानभरपाई मिळविण्यासाठी रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागेल . श्री . विजेंद्र वानखेडे , सरपंच ग्रामपंचायत पाटाळा.
▪️दोन दिवसापूर्वी झालेल्या मुसळधार पाऊसाने शिरणा नदीला पूर आल्याने नदीकाठच्या शेतीत पुरामुळे सोयाबीन व कापूस पिकांचे पूर्णपणे नुकसान झाले असून अजून पर्यंत महसूल विभागाने पंचनामे न केल्याने शेतकऱ्यांचे भविष्य अंधारमय होण्याचे चित्र दिसत आहे. महेश झाडे , पिडीत शेतकरी पळसगाव.



