आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ओबीसींच्या जातिनिहाय जनगणना करण्याचे राजपत्र काढा- सचिन राजुरकर

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

सावली – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील व्याहाड खुर्द येथील बाजार समिती सभागृहात राष्ट्रीय ओबीसी महासंघाच्या वतीने महत्त्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली. या बैठकीत ओबीसी समाजाची जातनिहाय जनगणना करण्याची मागणी तसेच दिनांक १४ मे २०२६ रोजी महाराष्ट्र शासनाच्या मंत्रिमंडळाने घेतलेल्या निर्णयाच्या विरोधात चर्चा करण्यात आली.
बैठकीत रविवार, दिनांक २८ जून २०२६ रोजी चंद्रपूर येथे आयोजित करण्यात येणाऱ्या भव्य महामोर्चाच्या नियोजन व तयारीबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. महामोर्चा यशस्वी करण्यासाठी गावोगावी जनजागृती, संघटन बांधणी आणि मोठ्या संख्येने सहभाग नोंदविण्याचे आवाहन करण्यात आले.
यावेळी राष्ट्रीय ओबीसी महासंघाचे महासचिव सचिन राजूरकर, बोलताना म्हणाले की केंद्र सरकारने ओबीसींच्या जातनिहाय जनगणना करण्याचे राजपत्र काढतं नाही तो पर्यंत ओबीसीचे असहकार आंदोलन सुरू राहील येणाऱ्या हिवाळी अधिवेशनात नई दिल्ली येथे रामलीला मैदानावर मोठे देशव्यापी आंदोलन उभारले जाईल असेही मनाले या वेळी आदिवासी विकास परिषदेचे जिल्हाध्यक्ष मा. कृष्णा मसराम तसेच सामाजिक कार्यकर्ते मा. जयदीप रोडे व राष्ट्रीय ओबीसी महाघांचे सावली तालुका अध्यक्ष श्री कविंद्र रोहणकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.या सभेला किशोर वाकूडकर, नितीन गोहने, दिनेश चिटनूरवार,अर्जुन भोयर,किशोर घोटेकर,भाऊराव कोठारे,अरुण पाल, मोतीराम चिमुरकर,पवन कवठे,जितू सोनटक्के, प्रवीण गेडाम, लोकनाथ रायपुरे, उत्तम गेडाम, नितीन कारडे, दिलीप लटारे, अविनाश भुरसे, केशव भरडकर, नरेश बाबनवाडे, विनोद धोटे, विशाल करंडे,पुनम झाडे ,अनिल मशाखेत्री,दीपक शेंडे,सूरज किणेकर,अनिकेत भुरसे रुपेश किरमे तुळशीदास भुरसे, हेमंत झाडे आदी ओबीसी बांधव उपस्थित होते,
या सहविचार सभेचे प्रास्ताविक कवींद्र रोहणकर, संचालन पुनम झाडे यांनी तर आभार प्रदर्शन रुपेश किरमे यांनी मानले, सभेत बहुसंख्य ओबीसी बांधव उपस्थित होते

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.