ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

नारायणपूर-मेडाराम परिसरात अनेक नागरिकांचा भारतीय कम्युनिष्ट पक्षात प्रवेश..

 

गडचिरोली जिल्हा प्रतिनिधि उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : नारायणपूर व मेडाराम परिसरातील वेंकांना रामाया भिमकारी, माजी सरपंच केशव अशांना नस्कुरी, पोचाना इराबोईना, राजशेखर भीमकरी, श्रीनू लेंकाला यांच्यासह अनेक नागरिकांनी कॉ. सचिन मोतकुरवार यांच्या हस्ते भारतीय कम्युनिष्ट पक्षात जाहीर प्रवेश केला.

यावेळी आयोजित बैठकीत पक्षाच्या कार्यपद्धती, जनतेच्या प्रश्नांवरील लढा व आदिवासी, शेतकरी, कामगारांच्या हक्कांसाठी पक्ष सातत्याने संघर्ष करत असल्याचे मार्गदर्शन करण्यात आले.

या प्रसंगी भारतीय कम्युनिष्ट पक्षाचे जिल्हा सहसचिव सचिन मोतकुरवार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन करत जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी संघटित होण्याचे आवाहन केले. तसेच जिल्हा कार्यकारणी सदस्य सुरज जक्कुलवार व तालुका सचिव रवी बारसंगडी हे प्रमुख उपस्थित होते.

पक्षात प्रवेश केलेल्या नागरिकांचे स्वागत करत पक्षाच्या माध्यमातून जनतेच्या हक्कांसाठी व स्थानिक प्रश्न सोडवण्यासाठी एकजुटीने संघर्ष करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.