आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️जिल्हाधिका-यांनी घेतला राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा आढावा..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. 6 : चंद्रपूर जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण कक्षाचा जिल्हाधिकारी वसुमना पंत यांनी आढावा घेतला. राष्ट्रीय एड्स कार्यक्रम अंतर्गत जिल्ह्यातील एचआयव्ही बाधितांसाठी विविध आरोग्य योजना सुरू आहेत. या आरोग्य योजना रुग्णांपर्यंत पोहोचविण्याच्या सूचना जिल्हाधिका-यांनी दिल्या.

यावेळी अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भास्कर सोनारकर, जिल्हा मातृत्व व बालसंगोपन अधिकारी स्नेहल कसारे, डॉ.राजेंद्र सुरपामा, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. ललितकुमार पटले, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मिनाक्षी भस्मे, महानगर पालिका चंद्रपूरचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अतुल चटकी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार, एआरटी वरीष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप मडावी आदी उपस्थित होते.

जिल्ह्यातील अतिजोखीम गटात असणाऱ्या समुदायातील प्रत्येकाला सर्व शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी अशासकीय संस्थांची मदत घेऊन त्यादिशेने कार्य करण्याच्या सूचना वसुमना पंत यांनी दिल्या. तसेच एचआयव्हीसह जगणाऱ्यासाठी शासनाची मोफत बस पास योजना असून त्याचा लाभ प्रत्येक एचआयव्ही सह जगणाऱ्या व्यक्तीला सहामाही पास योजना, एचआयव्हीसह जगणाऱ्या बालकांसाठी बाल संगोपन योजना व मिशन वात्सल्य योजना, तसेच विमा कवच साठी प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजना मिळावी, यासाठी जिल्हाधिकारी यांनी संबधित विभागाला सूचना देण्यात आल्या.

राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमाची माहिती सादर करतांना जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात प्राथमिक आरोग्य केंद्रापासून ते शासकीय वैद्यकीय महाविद्यालयापर्यंत एचआयव्ही समुपदेशन व चाचणी सुविधा मोफत पुरविण्यात येत असल्याची माहिती दिली. त्याचप्रमाणे 2026 ते 2027 या कालावधीत राबविण्यात येणाऱ्या “मिशन एड्स सुरक्षा” संदर्भात माहिती दिली.

तसेच अतिजोखीम गटात असणाऱ्या टीजी, एमएसएम, एफएसडब्ल्यु यांना राशन कार्ड मध्ये अंत्योदय, आधार कार्ड, मतदान कार्ड, तसेच संजय गांधी निराधार योजनेचा पाठपुरावा व इतर शासकीय योजनांचा लाभ देण्यासाठी जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या निर्देशानुसार जिल्हा समुदाय संसाधन समूह स्थापन करण्यात आले आहे.

आढावा बैठकीदरम्यान जिल्हा कार्यक्रम अधिकारी सुमंत पानगंटीवार यांनी जिल्ह्यात या वर्षात राबविण्यात ग्राम पंचायत स्तरावर बैठका, 15 संवेदनशील गावांमध्ये पथनाट्य, प्लॅश मौब, महाविद्यालय स्तरावरील रेड रिबन क्लब स्थापना व एचआयव्ही सह जगणाऱ्या बालकांना पौष्टिक आहार वाटप या बद्दल सविस्तर माहिती दिली. बैठकीला संबोधन ट्रस्ट , संकल्प बहुउध्येशिय ग्राम विकास संस्था, नोबल शिक्षण संस्था, क्राईस्ट हॉस्पीटल, प्लॅन इंडिया आदी स्वयंसेवी संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.