आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हा पोलीसांची अवैध धंदयांविरुध्द धडक कारवाई..

▪️माहे मे, २०२६ मध्ये लाखो रुपयांचा मुद्देमाल जप्त..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्हा पोलीस दलातर्फे जिल्ह्यातील अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी ‘माहे मे २०२६’ मध्ये व्यापक आणि धडक मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान दारूबंदी, जुगार, अवैध जनावरांची वाहतूक, अमली पदार्थ (NDPS) आणि रेती चोरी यांसारख्या विविध गंभीर गुन्ह्यांवर कडक कारवाई करत कोट्यवधी रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलिसांनी महिनाभरात केलेल्या कारवाईचा तपशीलः दारूबंदी व हातभट्टी दारू विरोधी कारवाईः जिल्ह्यात दारूबंदी कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कडक नजर ठेवत पोलिसांनी ५८४ गुन्हे उघडकीस आणले असून, तब्बल ४५,९०,५९२/- रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याशिवाय, हातभट्टी दारू तयार करणाऱ्या व विक्री करणाऱ्यांवर ४६ कारवाया करून ६,५९,३६५/- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे., जुगार कायदा कारवाईः जुगाराच्या अड्ड्यांवर धाडी टाकून ९० गुन्हे दाखल करण्यात आले असून ९,०७,००३/- रुपये जप्त करण्यात आले., गौण खनिज (रेती) ची अवैध चोरटी वाहतुक विरोधी कारवाईः पर्यावरणाचे नुकसान करणाऱ्या रेती माफियांविरुद्ध २७ कारवाया करत ३,३४,८५,५००/- रुपये किमतीची रेती आणि वाहने जप्त केला आहे., अवैध जनावर वाहतूकः गोवंशीय जनावर/प्राण्यांच्या छळाविरुद्ध आणि जनावर अवैध वाहतुकीविरुद्ध ९ गुन्हे दाखल करून १,२७,१५,६००/- रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. या कारवाईत १३७ जनावरांची सुटका करण्यात आली, १३ वाहने जप्त करण्यात आली आणि ७० किलो मांस (Beef/Meat) जप्त करण्यात आले.,
अमली पदार्थ विरोधी कारवाई (NDPS Act): तरुणाईला नशेच्या गर्तेत ढकलणाऱ्या ड्रग्ज तस्करांविरोधात २१ गुन्हे नोंदवून एकूण १८,७८,५६८/- रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. यामध्येः, गांजाः ६.२४१ किलो (किंमत रु. ४,७०,०००/-), एम.डी. (MD): १३०.९९ ग्राम (किंमत रु. १३,९९,५००/-), डोडा पावडरः २.२६७ किलोग्राम (किंमत रु. ९,०६८/-), चोरी व इतर कायदेविषयक कारवायाः मोटार सायकल चोरीः १० गुन्हे उघड करून ४,०३,०००/- रुपयांच्या दुचाकी हस्तगत, सुगंधित तंबाखूः १२ कारवायांमध्ये १७,३४,०६२/- रुपयांचा प्रतिबंधित सुगंधित तंबाखू जप्त, COPTA Act: सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व तंबाखू नियंत्रण कायद्यांतर्गत १४४ गुन्हे नोंदवून २८,८००/- रुपये दंड/मुद्देमाल जप्त., हत्यार कायदा (Arms Act) अंतर्गत कारवाईः बेकायदेशीर घातक शस्त्रे बाळगणाऱ्यांवर ९ कारवाया करून ८,५००/- रुपये किमतीची शस्त्रे जप्त करण्यात आली. यामध्ये भरमार बंदूक २, पिस्टुल १, तलवारी – ६, चाकू १ आणि खंजर १ अश्या शस्त्रांचा समावेश आहे. पोलीस प्रशासनाचे आवाहनः चंद्रपूर जिल्हा पोलीस दल जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी

आणि अवैध धंद्यांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी कटिबद्ध आहे. नागरिकांनी आपल्या परिसरात कुठेही अवैध धंदे, दारू विक्री किंवा संशयास्पद हालचाली आढळल्यास त्वरित जवळच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस प्रशासनातर्फे करण्यात आले आहे. माहिती देणाऱ्याचे नाव गुप्त ठेवण्यात येईल.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.