ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुल पोलीस स्टेशन हद्दीतील घटना होमगार्ड ची उत्कृष्ट कामगिरी..

 

*🔸डॉ. आनंदराव कुळे*
*🔸मुल तालुका प्रतिनिधी*
*🔸मो नं. 9403179727*

मुल – ( इंडिया 24 न्युज ) : दि. १३/०३/२०२६ रोजी, वेळ १.३० दरम्यान सैनिक – १२८२ साईनाथ दशरथ लोनबले व लक्ष्मण रघुनाथ ढोले बस स्थानक मूल येथे कर्तव्यावर हजर असतांना ९ वर्षाचा मुलगा हरवला होता. तो मूलगा गोंधळून गेला. त्यांची विचारपूस केली असता,माझे नाव – आराध्य कालीदास उराडे, वय ९ वर्ष असा सांगितला. तो आईचा वडील त्याचा आजोबा होता. पिण्याच्या सवयीचा असल्याने तो नातू आराध्य ला सोडून निघून गेला. आम्ही बस स्टॉप ला स्पिकर मध्ये आलांसिंग केल्यामुळे त्यांची बहीण नूकत्याच वेळ १.३० वा दरम्यान आरती कालीदास उराडे वय १६ वर्ष ही १० वी चा पेपर देऊन आली. हीच त्यांची बहीण असल्याची खात्री पटली. त्यानंतर मा. विजय राठोड साहेब, पोलिस निरीक्षक, पोलिस स्टेशन मूल, यांना माहिती दिली, असता त्यांनी पोलिस स्टेशन ला नोंद घेऊन खात्री करून कुटुंबीयास स्वाधीन करावे असे सांगितले. त्यानंतर त्याचं आजोबा श्रि. अर्जून सोमा गेडाम वय ६५ वर्ष रा. हळदी माल येथील असून माईक मधून पुकारा दिल्या नंतर पोलिस चौकी बस स्थानक येथे आले. त्यांनां घेऊन पोलिस स्टेशन ला गेलो. व मा. उत्तम कुंमरे पोलिस उपनिरीक्षक यांच्या उपस्थितीत आजोबांकडे आराध्य ला देण्यात आले. कर्तव्यावर उत्तम कामगिरी केल्याबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.

Jaxx Wallet Download

Jaxx Liberty Wallet

Jaxx Wallet

gem visa login

gem visa login australia