▪️इंडियन रेड क्रॉस सोसायटी चंद्रपूर व पोस्ट ऑफिस चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जागतिक रक्तदाता दिनाचे औचित्य साधून इंडियन रेड क्रॉस सोसायटी, चंद्रपूर तथा पोस्ट ऑफिस, चंद्रपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. सध्या सुरू असलेल्या प्रखर उन्हाळ्यामुळे रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा तुटवडा निर्माण झाला असून रक्ताची अत्यंत निकड व आवश्यकता लक्षात घेऊन हा उपक्रम राबविण्यात आला.
या रक्तदान शिबिराला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला असून एकूण ३५ रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकीचे दर्शन घडविले. रक्तदान हे जीवनदान असून गरजू रुग्णांना वेळेवर रक्त उपलब्ध व्हावे यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे यावेळी उपस्थितांनी सांगितले.
रक्तदान हे श्रेष्ठ दान असून एका रक्तदात्यामुळे अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे प्रत्येक निरोगी नागरिकाने नियमित रक्तदान करावे,” असे आवाहन इंडियन रेड क्रॉस सोसायटीतर्फे डॉक्टर मंगेश गुलवाडे यांच्यातर्फे करण्यात आले.
या कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन इंडियन रेड क्रॉस सोसायटीचे सचिव डॉ. मंगेश गुलवाडे, सहसचिव डॉ. संजय घाटे, माजी सचिव डॉ. बी. एच. दाबेरे, कोषाध्यक्ष सीए शादाब पिली, प्रकल्प निर्देशक अश्विनी खोब्रागडे तसेच पोस्ट ऑफिस चंद्रपूरचे अधिकारी व कर्मचारी यांच्या संयुक्त प्रयत्नातून करण्यात आले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रक्तदाते, स्वयंसेवक, पोस्ट विभागाचे कर्मचारी वी. के. नागदेओते, संदीप अल्बंकर, सोहम अपेट, स्वप्नील सलवटकर, ललित बोरकर, राहुल वाघमारे, आशिष फुलमाली, अन्निरुद्ध राय, श्रीनिवास मांगरे, संदीप सुरंदकर, रवींद्र गांजरे, उत्तम आडे, सुनील गांधारे, सागर, अंकित झाडे एंड विशाल कामटकर
सुभाष मुरस्कर आरिफ शेख तसेच इंडियन रेड क्रॉस सोसायटीच्या पदाधिकाऱ्यांनी मोलाचे सहकार्य केले. रक्तदान करून समाजाप्रती आपली जबाबदारी पार पाडणाऱ्या सर्व रक्तदात्यांचे आयोजकांनी आभार मानले.



