▪️गडचांदूर हद्दीतून कत्तलीसाठी नेली जाणारी 12 गोवंश जनावरांची सुटका..
▪️दोघांवर गुन्हा दाखल, एकुण रुपये 7 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त,पोलीस स्टेशन गडचांदुर ची कामगिरी..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
गडचांदूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलिसांना दिनांक 22 जून 2026 रोजी मुखाबिराकडून मिळालेल्या माहितीनुसार, एका पिकअप वाहनातून गोवंश जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक होणार होती. यावरून पोलिसांनी तात्काळ मौजा आसन बस स्टॉपजवळ नाकाबंदी करुन संशयित बोलेरो पिकअप वाहन क्रमांक MH ३२-AJ-६४७१ याला थांबवून पंचांसमक्ष पाहणी केली असता, वाहनात अत्यंत निर्दयतेने व कोंबाकोंबी करून, चारा-पाण्याची कोणतीही व्यवस्था न करता एकूण 12 नग जिवंत गाई आढळून आल्या. वाहनातील इसमाकडे पशुवैद्यकीय डॉक्टरांचे प्रमाणपत्र किंवा जनावरांच्या खरेदी-विक्रीच्या पावत्यांबाबत विचारणा केली असता, त्याने उडवाउडवीची उत्तरे दिली, यावरुन पोलिसांना संशय आल्याने त्यास विश्वासात घेऊन विचारपूस केली असता, सदर जनावरे कत्तलीसाठी बाहेरगावी घेऊन जात असल्याचे त्याने कबूल केले. या कारवाईत कत्तलीच्या उद्देशाने अवैधरित्या आणि निर्दयतेने घेऊन जात असलेली एकूण नग 12 जिवंत जनावरे (गाई) एकूण किंमत 2,40,000/- रुपये आणि वाहतुकीसाठी वापरण्यात आलेले पिकअप वाहन महिंद्रा मॅक्स बोलेरो पिकअप क्र. MH-३२-AJ-६४७१ अंदाजे किंमत 5,000,00/- रुपये असा एकुण 7,40,000/- रुपयाचा माल जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी पोलीस स्टेशन गडचांदुर येथे आरोपी नामे 1) संतोष रामाजी परचाके, वय 35 वर्षे, रा. कळंब हळदी पुरा- ता. जि. यवतमाळ यास ताब्यात घेवुन त्याचे विरुध्द गुन्हा नोंदविण्यात आला असुन त्याचा फरार साथीदार (पिकअप वाहन चालक) याचा शोध घेणे सुरु आहे. गुन्हयाचा पुढील तपास गडचांदुर पोलीस करीत आहे.
सदरची कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्री आयुष नोपाणी, अप्पर पोलीस अधीक्षक श्री ईश्वर कातकडे, उपविभागीय पोलीस अधिकारी, गडचांदूर श्री रवींद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि गडचांदूरचे ठाणेदार श्री शिवाजी कदम यांच्या नेतृत्वात सपोनी श्री सुखदेव गोदे, पोअं/ बलवंत शर्मा (ब.नं. 535), पोअं/सुरज (ब.नं. 1431), पोअं/प्रकाश (ब.नं. 1516) आणि पोअं/साईनाथ (ब.नं. 966) यांनी केली आहे.



