आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️बंगाली कॅम्प मच्छी मार्केटवर पोलिसांचा छापा..

▪️ आरोपीसह, ६०० किलो अंदाजे मुद्देमाल ७.६०,०००/ रुपयाचा प्रतिबंधित थाई मांगुर मासेसह जप्त..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दिनांक २२/०६/२०२६ रोजी १४.०० वाचे सुमारास पोउपनि कृष्णा दराडे पोस्टे रामनगर सोबत पोहवा शरद कुडे पोस्टे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना खात्रीशीर बातमीदार यांच्या मार्फत माहीती मिळाली की, बंगाली कॅम्प मच्छी मार्केट येथे केंद्र शासनाने प्रतिबंधीत केलेला थाई मांगुर जातीचा मासा विक्री करीता एका महिंद्रा बोलेरो पिकअप मध्ये आलेला आहे. अशा माहितीचे अनूशंगाने सदर ची माहिती पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके यांना दिली त्यांच्या आदेशाने बंगाली कॅम्प येथे जावुन सदर चे मासे ताब्यात घेतले व मत्स्य व्यवसाय विकास अधिकारी यांनी सदर माश्याची खात्री केली असता तो थाई जातीचा मांगुर मासा असल्याचे सांगीतले. सदर चा मासा हा मानवी जिवीतास हानीकारक आहे व त्याचे सेवण केले असता कॅन्सर सारखा आजार होतो . त्यामुळे शासनाने ते प्रतिबंधीत केलेले आहेत. सदर माश्याबद्दल खात्री मिळ्याल्याने आरोपी नामे व्येंकटेश्वरराव ग्रुिपथीराव घंटासाला राडि एन ओ ४-७६ ए प्रथिकोल्लांका जि ईलूरु राज्य आंध्रप्रदेश मोनं ९४९१२४८१९० यांना ताब्यात घेवुन पो स्टे रामनगर अप क्र ८५४/२०२६ कलम २२३,२७२,२७५ बिएनएस २०२३ सहकलम अन्न सुरक्षा आणि मानके अधिनियम २००६ कलम ५९ (आय) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला. सदर चा जप्त मुदृदेमाल १) थाई जातीचे मांगून मासे वजन अंदाजे ६०० किलोग्रॅम किंमत अंदाजे – ६०,००० रु २) महिंद्रा बोलेरो क्र TS ०६ UB ६५३८ किंमत अंदाजे -७ लाख रु एकुन ७ लाख ६० हजार रु याचा मुद्देमाल पंचाचे समक्ष जप्त करण्यात आला. वरील कारवाई ही मा. पोलीस अधिक्षक श्री आयुष नोपानी व मा. अपर पोलीस अधिक्षक श्री ईश्वर कातकडे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी श्री प्रमोद चौगुले यांचे सुचना व मार्गदर्शानाखाली पोस्टे रामनगर पोलीस निरीक्षक प्रभावती एकुरके तसेच सपोनी शिवाजी नागवे, सपोनी उगले, पोउपनी कृष्णा दराडे पोस्टे रामनगर डिबी स्टाफ चे पोहवा शरद कुडे, पोहवा आनंद खरात, पोहवा जितेंद्र आकरे, पोहवा बाबा नैताम पो अं प्रकाश मडावी व संपुर्ण डिबी स्टाफ यांनी केलेली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.