चंद्रपूर स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई : १०४.२१० ग्रॅम एम.डी. (Mephedrone) ड्रग्जसह दोन आरोपी अटकेत..
६.२३ लाखांचा मुद्देमाल जप्त..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे जटपुरा गेट परिसरात एम.डी. (Mephedrone) अमली पदार्थाची विक्री होणार असल्याची खात्रीशीर माहिती प्राप्त झाली. त्यानुसार पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने इटनकर पान मंदिर, जटपुरा गेट परिसरात सापळा रचून कारवाई केली.
कारवाईदरम्यान ओम संतोष इटनकर (वय २५ वर्षे, रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर) यास ताब्यात घेऊन त्याची व त्याच्या राहत्या घराची झडती घेण्यात आली. झडतीदरम्यान १०४.२१० ग्रॅम एम.डी. (Mephedrone) अमली पदार्थ, दोन मोबाईल फोन व रोख रक्कम असा एकूण ₹६,२३,३७०/- किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
प्राथमिक चौकशीत आरोपी ओम इटनकर याने सदर एम.डी. अमली पदार्थ इरफान उर्फ भुऱ्या पठाण, रा. बागलखिडकी, चंद्रपूर याच्याकडून विकत घेतल्याची माहिती दिली. त्यानुसार तांत्रिक व इतर पुराव्यांच्या आधारे आरोपी इरफान उर्फ भुऱ्या पठाण यालाही ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
सदर प्रकरणी पोलीस स्टेशन रामनगर येथे दोन्ही आरोपींविरुद्ध NDPS Act, 1985 चे कलम 8 (c), 22(c) व 29 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. तपासादरम्यान अमली पदार्थाचा पुरवठा करणारी साखळी, आर्थिक व्यवहार तसेच इतर संबंधित आरोपींचा शोध घेण्यात येत आहे.
अटक आरोपी
आरोपी १:
ओम संतोष इटनकर (वय २५ वर्षे), रा. जटपुरा वॉर्ड, चंद्रपूर.
आरोपी २:
इरफान उर्फ भुऱ्या पठाण, रा. बागलखिडकी, चंद्रपूर.
जप्त मुद्देमाल
एम.डी. (Mephedrone):
१०४.२१० ग्रॅम
मोबाईल फोनः
२ नग
रोख रक्कमः
नगदी
एकूण किंमतः
१६,२३,३७०/-
कारवाई करणारे पोलीस पथकः
सदर कारवाई पोलीस अधीक्षक, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अमोल काचोरे यांच्या नेतृत्वात सपोनि. हिवसे, पोउपनि. विनोद भुरले, पोउपनि. सुनील गौरकार, पोउपनि. संतोष निंभोरकर, पोउपनि. डोके, पोहवा सुभाष गोहोकार, पोहवा सतीश अवथरे, पोहवा रजनीकांत पुठ्ठावार, पोहवा दीपक डोंगरे, पोहवा इम्रान खान, पोहवा सुनील आत्राम, पोअं हिरालाल गुप्ता, पोअं किशोर वाकाटे, पोअं शशांक बदामवार, पोअं प्रतीक हेमके, पोहवा छाया, पोअं अपर्णा (स्थानिक गुन्हे शाखा, चंद्रपूर) तसेच श्वान पथकातील पोहवा राजेश किन्नाके व विनोद चव्हाण यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे.



