शाहू फुले आंबेडकरांच्या मुळे हिंदू महिला आज सुरक्षित व आर्थिक विकास व प्रगतीच्या मार्गास्थावर पंडितभाऊ दाभाडे

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं. 7030292628*
पुणे – ( इंडिया 24 न्युज ) : दि आरक्षणाचे जनक सामाजिक न्याय समता क्रांतीचे प्रणेते राजर्षी छत्रपती शाहू महाराज महात्मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजातील महिलांना मानाचे स्थान दिले असून आज समाजामध्ये सुरक्षित तर आर्थिक विकास व प्रगतीच्या मार्गात ह्या महिला असून हिंदू समाजातील हिंदू महिलांना कुच भावनेतून त्यांना वागणूक दिली जात होती अनेक ठिकाणी त्यांना प्रवेश नाकारून अपमानित केले जात होते अशा परिस्थितीमध्ये राजर्षी छत्रपती शाहू महाराज मा ज्योतिबा फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी हिंदू समाजातील महिलांना शिक्षणाची संधी उपलब्ध करून दिली त्यामुळे हिंदू समाजातील महिलांना सुरक्षिततेच्या व आर्थिक विकास व प्रगतीच्या मार्गस्थ वर पाऊल ठेवून आज महिला पुढे जात आहेत बाबासाहेब डॉ आंबेडकरांनी शिक्षण सामाजिक न्याय नोकरी तसेच सत्तेमध्ये वाटा हा हक्क ही या हिंदू महिलांना देऊन तर आरक्षण देऊन त्यांना त्यांचा हक्क मिळवून दिला आहे असे मत मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल यांनी व्यक्त केले
राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या १५२ जयंती दिनानिमित्त शुक्रवार दि २६ जुन २०२६ रोजी बहुजन जनता दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांना अभिवादन करण्यासाठी अभिवादन सभेचे आयोजन करण्यात आले होते तेव्हा मा श्री पंडितभाऊ दाभाडे राष्ट्रीय अध्यक्ष बहुजन जनता दल हे बोलत होते
मा श्री पंडितभाऊ दाभाडे यांच्यासह अनेक मान्यवरांनी मार्गदर्शन केले आणि राजर्षी छत्रपती शाहू महाराज पुष्पहार घालून नतमस्तक होऊन अभिवादन केले
यावेळी केशव गंगणे माजी नगरसेवक संजय इंगळे भिमराव पाटील विजय केळकर रमेश जाधव श्याम चौधरी रहमान शेख संभाजी गायकवाड राकेश माटुंगे राजेंद्र पाटील सुभाष ठाकरे रतन आमले दादासाहेब गायकवाड राजेंद्र जाधव शंकर बनसोडे शेखर दांडगे विशाल उगले यांच्यासह अनेक बहुजन जनता दलाचे कार्यकर्ते व पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बहुजन जनता दलाचे पुणे शहर अध्यक्ष महेंद्र काळे यांनी केले तर आभार प्रदर्शन बहुजन जनता दलाचे पुणे शहर प्रसिद्धी प्रमुख सुभाष सुरवाडे यांनी केले असे बहुजन जनता दलाच्या केंद्रीय मध्यवर्ती कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे



