जीर्ण शाळेच्या जागी उभे राहणार विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे नवे मंदिर; कामाची पाहणी..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : : शिक्षण हेच समाजाच्या प्रगतीचे खरे साधन असून विद्यार्थ्यांना सुरक्षित, सुसज्ज आणि गुणवत्तापूर्ण वातावरण मिळावे यासाठी एम.आय.एल. प्रभाग क्रमांक ३ मधील बॉम्बे प्लॉट, इंदिरानगर येथील पंडित जवाहरलाल नेहरू सेमि इंग्रजी माध्यम शाळेची जीर्ण झालेली इमारत पाडून त्या ठिकाणी नवीन अत्याधुनिक इमारत उभारण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.
या महत्त्वाकांक्षी कामाची पाहणी आज दिनांक २४ जून २०२६ रोजी सकाळी १० वाजता करण्यात आली. यावेळी प्रभागाचे लोकप्रिय नगरसेवक श्री जितेशदादा कुलमेथे, नगरसेवक श्री नितेश गवळे तसेच स्थानिक कार्यकर्ते उपस्थित होते.
पाहणीदरम्यान बांधकामाच्या प्रगतीचा आढावा घेण्यात आला. विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी उभारण्यात येणारी ही नवीन शाळा केवळ इमारत नसून हजारो विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना नवी दिशा देणारे ज्ञानमंदिर ठरणार असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.
वर्षानुवर्षे जीर्ण अवस्थेत शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना आता सुरक्षित, प्रशस्त आणि आधुनिक सुविधा लाभणार आहेत. त्यामुळे पालक, शिक्षक आणि परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण असून नवीन शाळेची इमारत लवकरात लवकर पूर्ण व्हावी अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
“विद्यार्थ्यांचे भविष्य घडविण्यासाठी शिक्षणाच्या पायाभूत सुविधांमध्ये कोणतीही तडजोड होणार नाही,” असा निर्धार यावेळी लोकप्रतिनिधींनी केला



