आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️महाकाली कॉलरी–रयतवारी कॉलरी मार्गाची दुरवस्था; ७ दिवसांत दुरुस्ती न झाल्यास मनसेचा आंदोलनाचा इशारा..

 

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २८ जुलै महाकाली कॉलरी ते रयतवारी कॉलरी रेल्वे गेट या मुख्य मार्गाची मुसळधार पावसामुळे अत्यंत दुरवस्था झाली असून रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडल्याने वाहनचालक, पादचारी व नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. वारंवार अपघाताची शक्यता निर्माण झाल्याने या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्यात यावी, या मागणीसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने महाकाली कॉलरीचे महाप्रबंधक तसेच चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर यांना निवेदन देण्यात आले.

मनसेचे जिल्हा सचिव किशोर डी. मडगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली विभाग अध्यक्ष साहिल खान यांच्या नेतृत्वात हे निवेदन सादर करण्यात आले. निवेदनात रस्त्यावरील खड्डे तातडीने बुजवून नागरिकांना सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.

यावेळी विभाग अध्यक्ष साहिल खान यांनी प्रशासनाला इशारा देत सांगितले की, सात दिवसांच्या आत रस्त्याची दुरुस्ती न झाल्यास महाराष्ट्र नवनिर्माण सेना नागरिकांच्या हितासाठी तीव्र लोकशाही मार्गाने आंदोलन छेडेल. त्यामुळे कोणतीही अनुचित परिस्थिती उद्भवल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी संबंधित प्रशासनाची राहील.

निवेदन देताना गुलशन यादव, ओम अंतरावर, फैजान शेख, मुज्जू सैयद यांच्यासह मनसेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
छायाचित्र: मनसेच्या शिष्टमंडळाने महाकाली कॉलरीचे महाप्रबंधक व चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर यांना रस्त्याच्या दुरुस्तीबाबत निवेदन सादर केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.