▪️विकासपुरुष मा. आमदार श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन..

डॉ. आनंदराव कुळे
मूल तालुका प्रतिनिधी
मूल – ( इंडिया २४ न्यूज ) : महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे विकासपुरुष तथा बल्लारपूर विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त दि.३०/०७/२०२६ रोजी भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, विविध भाजपा आघाड्या व सेल, तसेच भाजपाचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख आणि विविध आघाड्यांचे प्रमुख यांच्या संयुक्त विद्यमाने मूल शहरात विविध समाजोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
कार्यक्रमांची सुरुवात सकाळी ६.०० वाजता युवा मॅरेथॉन, ६.१५ वाजता महिला मॅरेथॉन आणि ६.३० वाजता युवती मॅरेथॉन यांनी होणार आहे. त्यानंतर सकाळी ८.०० वाजता सिद्धिविनायक मंदिर, मूल येथे भजन व आरती आयोजित करण्यात आली आहे.
त्यानंतर सकाळी १०.०० वाजता शालेय साहित्य वाटप, दुपारी १२.०० वाजता रामलीला सभागृह, मूल येथे आधार काठी वाटप, गुणवंत विद्यार्थी सत्कार, रक्तदान शिबिर, तसेच रक्त, बी.पी. व शुगर तपासणी शिबिर आयोजित करण्यात येणार आहे.
दुपारी ४.०० वाजता महाप्रसाद वाटप, सायंकाळी ५.०० वाजता विकासाची ज्योत रॅली, तर सायंकाळी ६.३० वाजता माता कन्यका मंदिर, मूल येथे महाआरती होऊन कार्यक्रमाची सांगता होणार आहे.
या समाजोपयोगी उपक्रमांमध्ये भारतीय जनता पार्टी, भाजपा युवा मोर्चा, भाजपा महिला मोर्चा, सर्व आघाड्या व सेलचे पदाधिकारी, मंडळ पदाधिकारी, बूथ प्रमुख, शक्ती प्रमुख, सर्व लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते तसेच मूल शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
मा. आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त समाजसेवा, आरोग्य जनजागृती, शिक्षण प्रोत्साहन आणि सामाजिक बांधिलकी जपणारे हे उपक्रम राबविण्यात येत असून, या कार्यक्रमांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन भारतीय जनता पार्टी, मूल शहर यांच्या वतीने करण्यात आले आहे.


