आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही जिल्हा बनविण्याचे संकल्प : मा. मिनाक्षी भस्मे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी

▪️बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मार्गदर्शन कार्यक्रम व कार्यशाळा: 500 पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविकांचा सहभाग..

 

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : ‘जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय मा. मिनाक्षी भस्मे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 30/07/2026 रोजी ठीक 12 वाजता, भवानजीभाई हॉयस्कूल चंद्रपूरच्या भव्य हॉलमध्ये 500 पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या उपस्थितीमध्ये जिल्हा महिला व बालविकास अधिकारी कार्यालय, बेटी बचाओ बेटी पढाओ अभियान मार्गदर्शन कार्यक्रम व कार्यशाळा आयोजित करण्यात आली. याप्रसंगी अध्यक्षीय मार्गदर्शन करतांना मा. मिनाक्षी भस्मे जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांनी सदर कार्यशाळा पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना कायदेशिर तसेच महिला बाल विकास विभागाच्या योजना व यंत्रणांची ओळख व्हावी व वार्ड / प्रभाग बाल संरक्षण समिती गठीत व्हावे याकरिता आयोजित करण्यात आल्याची अधोरेखीत केले तसेच सर्व विभागातील अधिकारी/कर्मचारी समन्वयाने कार्य करून चंद्रपूर जिल्हा बालविवाह मुक्त तसेच बालस्नेही जिल्हा बनविण्याचे संकल्प आपण सर्वांनी मिळून पूर्ण करू शकतो असा विश्वास व्यक्त केला तसेच बालकांची सुरक्षितता या अनुषंगाने भिक्षेकरी, बालकामगार, अल्पवयीन प्रसुती माता, पोक्सो पिडीत सर्व बालके, बालविवाह पिडीत बालके अंगणवाडी क्षेत्रात असल्यास त्वरीत चाईल्ड हेल्पलाईनच्या 1098, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, महिला हेल्पलाईन 181 तसेच पोलिस यांना त्वरीत माहिती द्यावी असे आव्हान केले. तर प्रमुख अतीथी म्हणून मा.प्रकाश भांदककर बा. वि. प्र. अ. शहरी प्रकल्प चंद्रपूर यांनी मार्गदर्शन करतांना बाल संरक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या यंत्रणा सखी वन स्टॉप सेंटर, चाईल्ड हेल्पलाईन 1098, महिला हेल्पलाईन 181, जिल्हा बाल संरक्षण कक्ष, बाल कल्याण समिती, बाल न्याय मंडळ, महिला सक्षमीकरण केंद्र, शक्तिसदर स्वाधार महिला निवास गृह, वर्कीग वूमन होस्टेल आदी यंत्रणा विषयी माहिती व यंत्रणांचे कार्य अधोरेखीत केले. प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित क्षमा बासरकर अध्यक्षा बा. क. स. चंद्रपूर, ज्योत्स्ना माहितकर सदस्या, बा. क. स. चंद्रपूर यांनी पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्याशी प्रश्नोत्तर सत्र घेतले व बाल न्याय अधिनियम, पोक्सो कायदा व बाल कल्याण समिती समक्ष येणाऱ्या केसेस विषयी चर्चा केली.

मा. मिनाक्षी दा. भस्मे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, चंद्रपूर यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी मोरेश्वर झोडे जि.प.अ.जिमबा कार्या, अतिशकुमार चव्हाण प.अ.जिमबा कार्या, सायली पाटील प.अ.जिमबा कार्या, अजय साखरकर जिबासंअ, अभिषेक मोहुर्ले, जिप्रस CHL, कल्याणी रायपुरे केंद्र प्रशासक OSC, शारदा चट्टे अधिक्षिका शक्तिसदन, सखी वन स्टॉप सेंटर, शक्तिसदन स्वाधार महिला निवासगृह, जिल्हा व रेल्वे चाईल्ड हेल्पलाईन, महिला सक्षमीकरण केंद्र, भवानजीभाई हॉयस्कूल प्राचार्य, शिक्षक व इतर कर्मचारी आदींनी मोलाची भुमिका बजावली. कार्यक्रमाचे संचालन पपीहा महाकाळकर, तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक मोरेश्वर झोडे जि.प.अ.जिमबा कार्या यांनी तर आभार भास्कर ठाकूर पर्यवेक्षक रेल्वे चा. हेल्प. यांनी केले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.