ताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मुत्तापूर पुलिया पाण्याखाली; गुमालकोंडा परिसरातील सहा गावे संपर्काबाहेर : भारतीय कम्युनिस्ट पक्षाचा तीव्र आंदोलनाचा इशारा..

 

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली : ( इंडिया 24 न्युज ) : सिरोंचा तालुक्यातील ग्रामपंचायत गुमालकोंडा अंतर्गत गुमालकोंडा, मुत्तापूर, सोमनूर, मुकीडिगुत्ता, जुना सोमनूर आणि नवीन सोमनूर ही गावे मुसळधार पावसामुळे पूर्णपणे संपर्काबाहेर गेली आहेत. मुत्तापूर येथील पुलियावर नदीचे पाणी आल्याने वाहतूक पूर्णपणे बंद झाली असून नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले आहे.

या परिस्थितीमुळे रुग्णांना उपचारासाठी सिरोंचा उपजिल्हा रुग्णालयात जाता येत नाही. तसेच शासकीय कामकाज, विद्यार्थ्यांचे शिक्षण, शाळेत जाणे, अत्यावश्यक सेवा, बाजारपेठ आणि दैनंदिन जीवनावर मोठा परिणाम झाला आहे. एखादी आपत्कालीन वैद्यकीय परिस्थिती उद्भवल्यास नागरिकांसमोर जीविताचा गंभीर प्रश्न निर्माण होत आहे.

या गंभीर परिस्थितीची तातडीने दखल घेऊन शासनाने मुत्तापूर येथे उंच पुलाचे बांधकाम करावे तसेच कायमस्वरूपी वाहतुकीची व्यवस्था करावी, अशी मागणी भारतीय कम्युनिस्ट पक्ष (CPI) च्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे. अन्यथा तीव्र लोकआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला आहे.

या मागणीसाठी देविदास लटकरी, इंद्रकुमार गोगुला, रमेश जंगम, हार्यंत कुमारी, श्रीनिवास जंगम, सडवली लटकरी, संजय गोगुला तसेच भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे इतर कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी शासनाकडे तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे.

स्थानिक नागरिकांनीही प्रशासनाने त्वरित पाहणी करून उंच पूल व सर्व ऋतूंमध्ये सुरू राहील असा रस्ता उपलब्ध करून द्यावा, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याची भीती व्यक्त केली आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.