आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चंद्रपूर जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी विशेष मोहीम..

▪️आतापर्यंत ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*

चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी तसेच गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींवर वचक निर्माण करण्यासाठी चंद्रपूर जिल्हा पोलीस दलातर्फे विशेष प्रतिबंधक मोहिमेचे (Preventive Action Camp) आयोजन करण्यात येत आहे. पोलीस अधीक्षक श्री. आयुष नोपाणी यांच्या मार्गदर्शनाखाली आणि अपर पोलीस अधीक्षक श्री. ईश्वर कातकडे यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीत जिल्ह्यातील विविध उपविभागांमध्ये हे शिबिर घेऊन भारतीय नागरिक सुरक्षा संहिता (BNSS) कलम १२६ व १२९ अन्वये धडक कारवाई करण्यात येत आहे.

या विशेष मोहिमेअंतर्गत आतापर्यंत एकूण ५२८ इसमांवर प्रतिबंधक कारवाई पूर्ण करण्यात आली आहे.

उपविभागनिहाय प्रतिबंधक कारवाईचा तपशीलः दिनांक उपविभाग लागू कलमे (BNSS) एकूण कारवाई (आरोपी संख्या) १६/०७/२०२६ वरोरा १२६ व १२९,१०८, २७/०८/२०२६, वरोरा१२६ व १२९, ११२, ०३/०९/२०२६ ,चंद्रपूर १२६ व १२९, १३५,०७/०९/२०२६, राजुरा
१२६ व १२९, ७४, ०९/०९/२०२६, चिमूर १२६ व १२९, ९९ एकूण : ५२८
या मोहिमेचा पुढील टप्पा म्हणून ब्रह्मपुरी व मूल उपविभागामध्ये येत्या दोन दिवसांत विशेष प्रिव्हेन्टिव्ह कॅम्प आयोजित करण्यात येत असून, तेथील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या संशयित इसमांवर प्रतिबंधक कारवाई केली जाईल.

समाजात शांतता व सुरक्षिततेचे वातावरण टिकून राहावे यासाठी चंद्रपूर पोलीस दल कटिबद्ध असून समाजकंटक तसेच उपद्रवी घटकांवर अशा प्रकारची कडक कायदेशीर कारवाई यापुढेही सातत्याने सुरू राहील.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.