▪️सावली तालुक्यातील सोनापूर येथे गॅस स्फोट, घर जळून खाक – दोन जण जखमी..
▪️सोनापूर (ता. सावली, जि. चंद्रपूर) | आज दि. १३ सप्टेंबर, सकाळी १०:३० सुमारास घडली घटना..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
सावली – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील सोनापूर गावात आज सकाळी भीषण घटना घडली. गावातील रहिवासी बंडू सोमणकर यांच्या घरात घरगुती गॅस सिलेंडरचा अचानक स्फोट झाला.
स्फोटाचा आवाज इतका मोठा होता की संपूर्ण गाव हादरले. स्फोट होताच घराने क्षणार्धात पेट घेतला आणि बघता बघता संपूर्ण घर आगीच्या भक्ष्यस्थानी सापडले. घरातील सर्व संसारोपयोगी साहित्य जळून खाक झाले आहे.
या दुर्घटनेत दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. पोलिस व महसूल प्रशासनाला घटनेची माहिती देण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.ए
गॅस गळती हे स्फोटाचे कारण असल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.
प्रशासनाकडून नागरिकांना गॅस वापरताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.



