आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️आईच्या अस्ती- रक्षेत आंबा व जांभळाचे झाड लावून ​पुसद येथे जाधव परिवाराचा पर्यावरणपूरक व आदर्श उपक्रम..

राज जांभुळकर : मुख्य कार्यकारी संपादक

यवतमाळ – ( इंडिया 24 न्युज ) : ​आईच्या निधनानंतर परंपरेनुसार अस्थी व रक्षा नदीत विसर्जित न करता, त्या पवित्र रक्षेमध्ये आंबा व जांभूळ या दोन वृक्षांची लागवड करून आईला हिरवाईच्या रूपात कायमस्वरूपी जिवंत ठेवण्याचा एक अत्यंत स्तुत्य व पर्यावरणपूरक संकल्प पुसद येथील ‘माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन’चे अध्यक्ष तथा वृक्षप्रेमी गजानन जाधव व त्यांच्या परिवाराने केला असून या अनोख्या उपक्रमाचे संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

​गजानन जाधव यांच्या मातोश्री स्व. शांताबाई दत्तात्रय जाधव यांचे नुकतेच निधन झाले. मृत्यूनंतर नदीचे प्रदूषण टाळत पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठी त्यांनी रक्षा विसर्जन नदीत न करता, ‘एक पेड माँ के नाम’ या संकल्पनेतून थेट वृक्षांची लागवड करण्याचा निर्णय घेण्यात आला.
​​​रक्षा सावडल्यानंतर त्याच पवित्र रक्षेमध्ये आंबा व जांभळाच्या वृक्षांचे रोपण करण्यात आले.
​या प्रेरणादायी उपक्रमाला ‘माणुसकीची भिंत सोशल फाउंडेशन पुसद’, ‘मिशन ग्रीन बहुउद्देशीय संस्था’ व ‘वसुंधरा बहुउद्देशीय संस्था’ रुग्णमित्र फाउंडेशन, समाजकार्य महाविद्यालय, या संघटनांनी पाठबळ दिले . सर्व नातेवाईक, निसर्गप्रेमी, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांनी या पर्यावरणपूरक रक्षा सावडणे व वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित राहून पर्यावरण संवर्धन करण्याचा अनोखा संदेश यावेळी देण्यात आला आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.