▪️रामनगर पोलिसांची धडक कारवाई: विनापरवाना प्लाझ्मा आणि कर्कश आवाजात डीजे वाजविणाऱ्यांवर गुन्हा दाखल..
▪️ट्रॅक्टर-ट्रॉलीसह डीजे व प्लाझ्मा साहित्य असा एकूण १२.५० लाखांचा मुद्देमाल जप्त..

*🔸सौ. शिल्पा बंनपुरकर*
*🔸संपादक*
*🔸मो नं.7030292628*
चंद्रपूर – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन रामनगर हद्दीमध्ये विनापरवाना, उच्च क्षमतेचे प्लाझ्मा लाईट्स आणि कर्णकर्कश आवाजात डीजे वाजवून ध्वनीप्रदूषण व सार्वजनिक शांततेचा भंग सुरू असल्याची खात्रीशीर माहिती रामनगर पोलिसांना मिळाली. सदर माहिती मिळताच पोलीस पथकाने तत्काळ घटनास्थळी जाऊन पाहणी केली असता, एका ट्रॅक्टर-ट्रॉलीवर डीजे साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा साहित्य बसवून शासकीय नियमांचे उल्लंघन करून मोठ्या आवाजात डीजे वाजविला जात असल्याचे निदर्शनास आले.
सदर ठिकाणी हजर असलेले ऑपरेटर व वाहनचालकाकडे डीजे, साऊंड सिस्टीम व प्लाझ्मा वाजविण्याबाबत अधिकृत सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगीची विचारणा केली असता, त्यांच्याकडे कोणताही वैध परवाना नसल्याचे स्पष्ट झाले. न्यायालयाचे आदेश व शासकीय नियमांचे उल्लंघन करून ध्वनीप्रदूषण निर्माण केल्याप्रकरणी रामनगर पोलीस ठाण्यात संबंधित इसमांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून सर्व मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. जप्त केलेल्या मुद्देमालाचा जप्त साहित्याचा व वाहनाचा तपशील १, अंदाजे किंमत (रु.) डीजे व प्लाझ्मा वाहतुकीसाठी वापरलेली ट्रॅक्टर व ट्रॉली २ ₹ ७,००,०००/- डीजे साऊंड सिस्टीम व उच्च क्षमतेचे प्लाझ्मा साहित्य ₹ ५,५०,०००/- एकूण जप्त मुद्देमाल किंमत : १२,५०,०००/-त्याचा माल जप्त. मार्गदर्शन व कारवाई करणारे अधिकारी आणि अंमलदार सदरची यशस्वी कारवाई पोलीस अधीक्षक चंद्रपूर, अपर पोलीस अधीक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी (चंद्रपूर) श्री. प्रमोद चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस स्टेशन रामनगरच्या पोलीस निरीक्षक श्रीमती प्रभावती एकूरके यांच्या नेतृत्वात ठाण्यातील पोलीस अधिकारी व अंमलदार पथकाने केली आहे.
कडक इशाराः सार्वजनिक शांततेचा भंग करणाऱ्या, विहित मर्यादेपेक्षा जास्त कर्कश आवाजात साऊंड सिस्टीम/प्लाझ्मा वाजविणाऱ्या तसेच विनापरवाना डीजे संचालन करणाऱ्यांवर यापुढेही चंद्रपूर पोलीस दलातर्फे अशीच कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.



