आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️ मा. ए.के. लाहोटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांनी पत्ते खेळु न दिल्याच्या कारणावरून जिवाने ठार मारणाऱ्या ठोकली शिक्षा..

▪️आरोपीला जन्मठेपाची शिक्षा..

मुख्य संपादक श्री. तुळशीराम जांभुळकर

राजुरा – ( इंडिया 24 न्युज ) : दि. ११/१२/२०२२ रोजी सकाळी ०९/०० वाजेच्या सुमारास बामंणवाडा ता. राजुरा येथे यातील मृतक ने आरोपीस पत्ते खेडु दिले नाही म्हणुन आरोपीयाने खेळत असलेल्या ठिकाणी पाणी टाकले, त्यामुळे त्याचे भांडण झाले. भांडणाचा रागात आरोपीने लोखंडी सुरी मृतकचा पोटात खुपसुन ठार केले. अशा फिर्यादीचा तोंडी रिपोर्ट वरून पोलीस ठाणे राजुरा येथे तत्परतेने गुन्हा रजीस्टर क. ५००/२०२२ कमल ३०२ भादवी सह ४,२५ भारतीय हत्यार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून आरोपीस अटक करण्यात आले. गुन्हयाचा सखोल तपास करून तपासी अधिकारी यांनी प्रत्यक्षदर्शी साक्षीदार, वैद्यकीय अहवाल व परिस्थतीजन्य पुरावे गोळा करून मा. न्यायालयात वेळेत दोषारोपत्र दाखल केले.

मा. न्यायालयचा निकाल : सदर खटल्याची सुनावणी मा. ए.के. लाहोटी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालय, चंद्रपूर येथे झाली. सरकार पक्षातर्फे सरकारी अभियोक्ता श्रीमती सिमा रामटेक, श्री. पि. जि. घट्टवार यांनी मांडण्यात आलेला युक्तीवाद व सादर केलेले साक्ष पुरावे मा. न्यायालयाने ग्राहय धरून आरोपीस दिनांक २४/०९/२०२६ रोजी आरोपीस कलम ३०२ भादवी कायद्यान्वये जन्मठेप वर्ष सक्त कारावास व ५,००० रू दंड, दंड न भरल्यास ३ महीण्याचा साधा कारावासाची शिक्षा देण्यात आली. तपास, मार्गदर्शक व न्यायालयीन पैरवी अधिकारी – तपासी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रशांत साखरे, पोलीस स्टेशन राजुरा, सरकारी अभियोक्ता अॅड श्रीमती सिमा रामटेक, श्री. पि. जि. घटूवार, कोर्ट पैरवी अधिकारी महीला पोलीस हवालदार ललीता शेंडे ब.न. १५५ पोस्टे राजुरा

दोषसिध्दी कक्ष, चंद्रपूर सदर कामगीरी मा. आयुष नोपाणी पोलीस अधिक्षक चंद्रपूर, मा. ईश्वर कातकडे अपर पोलीस अधिक्षक चंद्रपूर व उपविभागीय पोलीस अधिकारी राजुरा, यांच्या मार्गदर्शनाखाली पुर्ण करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.