आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र
▪️चामोर्शी : हायवेवर मोकाट जनावरांचा सुळसुळाट, मोठ्या अपघाताची शक्यता

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ
चामोर्शी – चामोर्शी तालुक्यातील मुख्य हायवे रोडवर बैल, गायी आणि इतर मोकाट ढोरे दिवस-रात्र रस्त्यावरच बसून राहत असल्याने वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
या हायवेवरून मोठ्या कंपन्यांचे ट्रक आणि इतर अवजड वाहने 24 तास ये-जा करत असतात. रस्त्याच्या मधोमधच जनावरे बसलेली असल्याने रात्रीच्या वेळी अचानक समोर आल्याने अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अनेक वेळा चालकांना अचानक ब्रेक लावावे लागतात.
स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, संबंधित बैल मालकांनी आपल्या जनावरांची तात्काळ व्यवस्था करावी आणि त्यांना मोकाट सोडू नये. तसेच प्रशासनाने आणि नगरपंचायतीने यावर तातडीने कारवाई करून मोकाट जनावरांचा बंदोबस्त करावा, अन्यथा मोठा जीवितहानीचा अपघात घडू शकतो.



