आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अपूर्ण पुलियांमुळे जनावरांचा जीव धोक्यात चामोर्शीत म्हैस नाल्यात पडली..

▪️पुलियांचे पॅकिंग तातडीने करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाचे PWD ला निवेदन देण्यात आले..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

चामोर्शी : नवीन बसस्थानक परिसरात सुमारे दीड वर्षापूर्वी करण्यात आलेल्या रस्ते व पुलिया बांधकामातील काही कामे अद्याप अपूर्ण असल्याने त्याचा फटका जनावरांना बसत असल्याचे समोर आले आहे. पुलियांच्या नाल्यावरील भागावर पाट्या पूर्णपणे पॅक न केल्यामुळे या ठिकाणी जनावरे पडण्याचा धोका निर्माण झाला आहे.

शुक्रवारी सकाळी सुमारे १०.३० वाजता यशोधरा विद्यालयासमोर देवराव नैताम यांच्या मालकीची म्हैस नाल्यात पडली. म्हशीला बाहेर पडण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. अखेर जेसीबीच्या सहाय्याने प्रयत्न करून म्हशीला सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आले.

या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्ये चिंता व्यक्त होत असून, अपूर्ण पुलिया व उघडे नाले भविष्यात जनावरांसह नागरिकांसाठीही धोकादायक ठरू शकतात, अशी भूमिका नागरिकांनी मांडली आहे.

दरम्यान, या समस्येकडे संबंधित विभागाचे लक्ष वेधण्यासाठी
शिवसेना शिंदे गटाच्या वतीने सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) यांना निवेदन देण्यात आले.पुलियांच्या उघड्या भागावर तातडीने पाट्या लावून पॅकिंग करावे, अपूर्ण कामे पूर्ण करावीत आणि भविष्यात जनावरे पडून दुर्घटना होऊ नये यासाठी आवश्यक सुरक्षा उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

यावेळी शिवसेना शिंदे गट चामोर्शी तालुका प्रसिद्धी प्रमुख सुरज नैताम, उपप्रमुख विक्की वालदे, सदस्य राहुल चिचघरे, अश्विन बोदलकार यांच्यासह चामोर्शीतील अनेक नागरिक व गावकरी उपस्थित होते.

जनावरांच्या सुरक्षेचा प्रश्न गांभीर्याने घेऊन संबंधित विभागाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अन्यथा भविष्यात मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने याकडे दुर्लक्ष करू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली.

चामोर्शी :अपूर्ण पुलियांच्या सुरक्षेसाठी PWD अधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले होते शिवसेना शिंदे गटाचे पदाधिकारी व नागरिक. यावेळी पुलियांचे उघडे भाग तातडीने पॅक करण्याची मागणी करण्यात आली.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.