सिंदेवाही पोलीस स्टेशनची मोठी कारवाई “नवयुवक बाल गणेश मंडळाच्या” कार्यकर्त्यावर व डीजे मालकावर गणेश विसर्जन..
▪️एकुण मुद्दे माल १५,३५,०००/-रू चा डिजे व इतर सहित्य व वाहने जप्त..

मुख्य संपादक श्री तुळशीराम जांभुळकर
सिंदेवाही – ( इंडिया 24 न्युज ) : पोलीस स्टेशन सिंदेवाही येथे आज दिनांक २४/०९/२०२६ रोजी मौजा पवनपार ता. सिंदेवाही येथील नवयुवक बाल गणेश मंडळ यांचे गणेश विसर्जन मिरवणुकीत डिजेमध्ये शासनाने प्रतिबंधित केलेले प्रेशरमिडचा उपयोग करून आदेशाचे उल्लंघन केल्याने दोन पंचासमक्ष जप्ती पंचनामा कार्यवाही करून डिजेमालक व गणेश मंडळाच्या कार्यकारणीवर पो.स्टे. सिंदेवाही येथे अपराध कंमांक-५७०/२६ कलम २२३, ३(५) भारतीय न्याय संहिता सहकलम ३८(१), १३६, ७० महाराष्ट्र पोलीस कायदयान्वये गुन्हा नोद करून एकुण १५,३५,०००/-रू चा डिजे व इतर सहित्य व वाहने जप्त करण्यात आले.
सदर ची कार्यवाही मा. पोलीस अधिक्षक सा. चंद्रपुर, अपर पोलीस अधिक्षक सा.चंद्रपुर, उपविभागिय पोलीस अधिकारी सा. ब्रम्हपुरी, पो.नी. कांचन पांडे ठाणेदार पोलीस स्टेशन सिन्देवाही यांचे मार्गदर्शनात पोउपनि श्रीकांत लांजेवार, पोलीस अंमलदार संजय जुगनाके, नारायण येगेवार, शुभम उराडे, कमलेश फेंडर, सुनिल बहेकार, नंदकिशोर तुमराम यांनी केली पुढील तपास सुरू आहे.



