आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️चामोर्शीतील हरणघाट नाक्यावर सकाळी खळबळ 50 वर्षीय महिलेने घेतली उडी..

▪️ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू..

गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ : उज्वल देवनाथ

गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी – दि. 28 सप्टेंबर 2026 चामोर्शी तालुक्यातील मुल रोडवरील हरणघाट नाका परिसरात आज सकाळी एक धक्कादायक घटना घडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

नेमकं काय घडलं?
आज सकाळी सुमारास हरणघाट नाका येथे एका महिलेने उडी घेतल्याची घटना स्थानिकांच्या निदर्शनास आली. घटनेची माहिती मिळताच नागरिकांनी धाव घेतली.

उडी घेणाऱ्या महिलेचे नाव शीला रमेश येडलावर (वय 50 वर्ष, रा. चामोर्शी, जि. गडचिरोली) असे असल्याचे समोर आले आहे.

तात्काळ रुग्णालयात दाखल
नागरिकांच्या मदतीने महिलेला तात्काळ बाहेर काढून ग्रामीण रुग्णालय, चामोर्शी येथे उपचारासाठी भरती करण्यात आले आहे. सध्या त्यांच्यावर डॉक्टरांच्या देखरेखीखाली उपचार सुरू आहेत. त्यांची प्रकृती स्थिर असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.