◼️गडचिरोली शासकीय विश्रामगृहात विविध विकासात्मक प्रश्नावर चर्चा

धनराज सरपाते- सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
सिंदेवाही 🙂 इंडिया २४ न्युज ) दि, २९ सप्टेंबर
गडचिरोली येथील शासकीय विश्रामगृहात मुख्यमंत्री मा. ना. देवेंद्रजी फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी (OSD) मा. अनिरुद्ध पालकर यांच्या उपस्थितीत जिल्ह्यातील विविध विकासात्मक बाबी, भौगोलीक परिस्थिती तसेच अतिरिक्त शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समायोजना संदर्भातील प्रश्नावर चर्चा करण्यात आली.
यावेळी गडचिरोली जिल्ह्यातील विविध विकासकामे, स्थानिक भौगोलीक परिस्थिती आणि समायोजन न झाल्यामुळे वेतनापासून वंचित असलेल्या शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या समस्यावर चर्चा करून संबंधित प्रश्न शासनस्तरावर मांडण्याबाबत विचार विनिमय करण्यात आला.
या बैठकीस माजी उपाध्यक्ष नगरपरिषद मा. प्रकाश ताकसांडे, माजी सभापती नगरपरिषद चंद्रशेखर भडांगे, समन्वय समिती संघटन सचिव बाळकृष्ण सावसाकडे, मातोश्री वृद्धाश्रमाचे संचालक सुनील पोरेडडीवर तसेच सामाजिक कार्यकर्ते मोतीराम लाटेलवार आदी उपस्थित होते.
या चर्चेमुळे जिल्यातील विकासकामे तसेच शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांना शासनदरबारी मांडण्यासाठी सकारात्मक पाठपुरावा होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली.



