आमदार देवराव भोगळे यांच्या वाढदिवसानिमित्त राजुरा विधानसभा क्षेत्र “कुपोषणमुक्त ” करण्याचा संकल्प
११ कुपोषित बालकांना " बाळुभेट" देऊन सामाजिक बांधिलकीचा संदेश

धनराज सरपाते – सिंदेवाही तालुका प्रतिनिधी
राजुरा:(इंडिया २४ न्युज )दि.२१ नोव्हें.२०२६
राजुरा विधानसभा क्षेत्राचे आमदार देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त, भाजप कार्यकर्ते मयूर बोंगीरवार यांच्या पुढाकाराने आणि बाळू फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमाने एक सामाजिक कार्यक्रम राबविण्यात आला. या उपक्रमांतर्गत ग्रामीण भागातील ११ कुपोषित बालकांना पोषण आहार संच म्हणजेच “बाळू भेट ” देऊन वाढदिवस साजरा करण्यात आला.
कार्यक्रमादरम्यान बाळू फाउंडेशन चे कार्य आणि आमदार देवराव भोंगळे यांच्या सहकार्यातून राजुरा तालुका पूर्णपणे कुपोषणमुक्त करण्याचे विशेष नियोजन जाहीर करण्यात आले. तसेच राजुरा विधानसभा क्षेत्रातील चारही तालुके कुपोषणमुक्त करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
कुपोषण निर्मूलन हे ईश्वरीय कार्य; आ. देवराव भोंगळे
उपस्थितांना मार्गदर्शन करताना आमदार देवराव भोंगळे म्हणाले की, ” बाळु फाउंडेशन ” करत असलेले कुपोषण निर्मुलनाचे काम हे खऱ्या अर्थाने ईश्वरीय कार्य आहे. या पवित्र कार्यात आणि बाळू फाउंडेशनच्या पाठीशी मी सदैव खंबीरपणे उभा राहीन. तसेच सर्व कार्यकर्त्यांनी आपले वाढदिवस सामाजिक उपक्रम राबवून साजरे करावेत, असे आवाहन त्यांनी केले. मोहिमेला यशस्वी करण्यासाठी मयूर बोंगीरवार यांनी पूर्ण सहकार्याची तयारी दर्शवली.
“बाळू भेट ” कार्यक्रमासाठी कुपोषित बालकाचे पालक, संबंधित आंगणवाडी सेविका, सुपरवायजर, मोट्या संख्येने उपस्थित होते. व्यासपीठावर आमदार देवराव भोंगळे, सौ. अर्चना देवराव भोंगळे वेकोली जीएम बल्लारपूरक्षेत्र ठाकरे, बाळू फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार, भाजप शहर महामंत्री सचिन भाऊ भोयर, भाजपचे मिलिंद देशकर, सदस्य अक्षय सुरतेकर आणि भाजप नेते मयुरजी बोंगीरवार यांची प्रमुख उपस्थिती होती.
सर्वस्तरातून उपक्रमाचे कौतुक:
राजुरा तालुक्यातील प्रतिष्ठित नागरिक, शासकीय अधिकारी, कर्मचारी वर्ग आणि पत्रकार बांधवही या उपक्रमाचे साक्षीदार ठरले. कार्यक्रमाचे शेवटी बाळु फाउंडेशनचे अध्यक्ष अमित महाजनवार यांनी आमदार देवराव भोंगळे यांनी दिलेल्या पाठबळाबद्दल आणि मयूर बोंगिरवार यांनी केलेल्या सहकार्याबद्दल आभार मानले. वाढदिवसाच्या निमित्ताने आवश्यक खर्च टाळून कुपोषित बालकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलणाऱ्या, या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे


