आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️अखेर आमदार देवराव भोंगळे यांच्यापुढे अल्ट्राटेक प्रशासन नमले..

▪️पालगांव वासीयांचे रस्त्याचे स्वप्न पूर्ण; कामगारांच्याही समस्या सुटणार..!

 

*🔸श्री. सचिन ढगे*
*🔸चंद्रपूर तालुका प्रतिनिधी*
*🔸मो. नं. 9359692716*

कोरपना – ( इंडिया 24 न्युज ) : दि. २६ जुन २०२५ , ४२ वर्षांपासून रस्त्याअभावी संघर्ष करणाऱ्या पालगांव वासियांचे स्वप्न आता पूर्ण होणार आहे. आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या ठिय्या आंदोलनानंतर अल्ट्राटेक सिमेंट प्रशासनाने नमते घेऊन पालगांवकडे जाणारा रस्ता येत्या ३० सप्टेंबरपर्यंत बांधून देण्याचे लेखी आश्वासन दिले आहे. तसेच, कंपनीतील कामगारांच्या योग्य मागण्यांवरही सकारात्मक निर्णय घेण्याचे मान्य करण्यात आले आहे.

गेल्या तीन दिवसांपासून अल्ट्राटेक सिमेंटच्या नांदा (फाटा) येथील गेटसमोर हे ठिय्या आंदोलन सुरू होते. या आंदोलनात आमदार देवराव भोंगळे हे स्वतः पुर्णवेळ सहभागी झाले होते.

मागील ४२ वर्षांपासून पालगांव वासीयांना गावात जाण्यास पक्का व चांगला रस्ताच नसल्याने ग्रामस्थ अल्ट्राटेक सिमेंट कंपनीविरोधात संघर्षरत होते. दि. २३ ते २५ जून या तीन दिवसांच्या कालावधीत अल्ट्राटेक सिमेंटच्या नांदा (फाटा) येथील मुख्य गेटवर आमदार देवराव भोंगळे यांच्या नेतृत्वात पालगांव वासीयांनी आपल्या न्याय्य मागण्या घेऊन ठिय्या आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे कंपनीच्या कामकाजावर मोठा परिणाम झाला. अखेर, कंपनीचे वरिष्ठ अधिकारी प्रमोद राजगढीया व पी. एस. श्रीराम यांनी आंदोलनाची दखल घेत आमदार देवराव भोंगळे यांना चर्चेसाठी सन्मानपूर्वक निमंत्रण देत त्यांच्यासोबत तीन तास चर्चा केली. आमदार भोंगळेंची शिष्टाई आणि पालगांव वासीयांची एकजुट यापुढे नमते घेत चर्चेअंती अल्ट्राटेक प्रशासनाने आंदोलकांच्या सर्व मागण्या मान्य केल्या. आणि येत्या ३० सप्टेंबरपर्यंत पालगांवकडे जाणारा रस्ता बांधून देणार व कामगारांच्याही न्याय्य मागण्या पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले.

🔸अल्ट्राटेकने फिरवला होता शब्द..

याआधी, ५ ते ७ मे रोजी याच ठिकाणी आंदोलन करण्यात आले होते. त्यावेळी कंपनीने पालगांवकडे जाणारा रस्ता आणि इतर मागण्या ३० मे पर्यंत पूर्ण करण्याचे लेखी आश्वासन दिले होते. मात्र, कंपनीने दिलेला शब्द पाळला नाही, त्यामुळे पुन्हा आंदोलन छेडण्यात आले होते.

सदर आंदोलन यशस्वी करण्यासाठी भाजपचे जिल्हा महामंत्री विवेक बोढे, तालुकाध्यक्ष संजय मुसळे, पालगांव-बाखर्डीचे सरपंच अरूण रागीट, तालुका महामंत्री सतिश उपलेंचवार, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष महेश देवकते, अमोल आसेकर, अरूण डोहे, आशिष ताजने, पुरुषोत्तम आस्वले, पुरुषोत्तम भोंगळे, महेश शर्मा, आबाजी पा. बोबडे, सुनिल उरकुडे, दत्ता राठोड, सुरेश रागीट, वामन तुराणकर, दिलीप गिरसावळे, बाळनाथ वडस्कर, विजयालक्ष्मी डोहे, संजय नित, प्रमोद कोडापे, अशोक झाडे, दिनेश ढेंगळे, निखिल भोंगळे, अमोल गोरे, रमेश चुदरी, हितेश चव्हाण, ओम पवार, हितेश चव्हाण, प्रमोद पायघन, सतीश जमदाडे, रवी बंडीवार, विशाल अहिरकर, सचिन आस्वले, सुजीत ठाकुर, पवन यादव, रोहन काकडे, दिपक वरभे, पुरुषोत्तम धाबेकर, नरेंद्र मडावी, सतीश करमरकर, रामदास पानघाटे, प्रफुल घोटेकर, सचिन भोयर, प्रदिप मोरे, दिपक झाडे, शितल धोटे, उमा कंठाळे, नमिता विश्वास, नम्रता डुकरे, रामदास खामनकर, गौतम खोब्रागडे, सिद्धार्थ कुंभारे, लालचंद नगराळे, आकाश रागीट, प्रकाश कुमरे, सुमित चांदेकर आदिंनी सहभाग नोंदवला होता.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.