▪️महाराजस्व अभियान समाधान शिबिराचे कुणघाडा रै.येथ आयोजन..
▪️महसूल विभागामार्फत प्रमाणपत्राचे वाटप..

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*
गडचिरोली – ( इंडिया 24 न्युज ) : चामोर्शी तालुक्यातील कुणघाडा रै.येथे महाराजस्व अभियानाचे आयोजन करण्यात आले “छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून, सामान्य जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी आणि त्यांना न्याय देण्यासाठी महायुती सरकार कटिबद्ध आहे. याच संकल्पनेतून चामोर्शी तालुक्यातील कुनघाडा रै. येथे ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर’ (टप्पा १) संपन्न झाले.
या शिबिराच्या माध्यमातून महसूल विभागाच्या सातबारा फेरफार सारख्या महत्त्वाच्या सेवा थेट नागरिकांच्या दारापर्यंत पोहोचवल्या जात आहेत.
यावेळी विविध शासकीय योजनांच्या पात्र लाभार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वाटप करण्यात आले.आजचे युग डिजिटल असल्याने प्रशासकीय कामात पारदर्शकता येत आहे,मात्र तांत्रिक अडचणींमुळे कोणाचेही काम थांबू नये,यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. विशेषतः आगामी काळात शालेय विद्यार्थ्यांनाही या महसूल साक्षरता मोहिमेत सहभागी करून घेण्याचा आमचा मानस आहे,जेणेकरून ते आपल्या पालकांना डिजिटल प्रक्रियेत मदत करू शकतील.
शेतकरी कल्याणाचा विचार करता,राज्य सरकारने ‘गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजने’चा लाभ आता शेतमजुरांपर्यंत पोहोचवला असून, नियमित कर्ज परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन भत्ता देऊन त्यांचा सन्मान केला आहे. कुनघाडा रै. येथील या शिबिरात मांडण्यात आलेल्या समस्यांचे १००% निराकरण करण्याचा शब्द जनतेला दिला असून, प्रशासन आणि शासन हे पूर्णतः नागरिकांच्या सेवेसाठी तत्पर आहे.”यावेळी गडचिरोली विधानसभा क्षेत्राचे आमदार डॉ.मिलिंद नरोटे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश बारसागडे, माजी सभापती पं.स.चामोर्शी मा.भाजपा तालुकाध्यक्ष आनंद भांडेकर,तालुकाध्यक्षा तथा सभापती न. पं.चामोर्शी रोशनीताई वरघंटे, भाजयुमो जिल्हाध्यक्ष मधुकर भांडेकर,अतिरिक्त जिल्हाधिकारी नितीन गावंडे, तहसीलदार प्रशांत घोरुडे, नायब तहसीलदार आष्टीकर उपस्थित होते.



