आपला जिल्हाताज्या घडामोडीदेश विदेशमहाराष्ट्र

▪️मांड्रा येथे भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात संपन्न..!

 

*🔸श्री. उज्वल देवनाथ*
*🔸 गडचिरोली जिल्हा ब्युरो चीफ*
*🔸 मो नं. 7499963831*

अहेरी – ( इंडिया 24 न्युज ) : तालुक्यातील मौजा मांड्रा येथे जय हनुमान सी.सी. मांड्रा यांच्या वतीने भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत परिसरातील अनेक संघांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून खेळाचे उत्कृष्ट प्रदर्शन केले. त्यामुळे संपूर्ण परिसरात क्रीडामय वातावरण निर्माण झाले होते आणि युवकांमध्ये विशेष उत्साह पाहायला मिळाला.
स्पर्धेच्या समारोप प्रसंगी विजेत्या व उपविजेत्या संघांना बक्षीस वितरण करण्यात आले. हा बक्षीस वितरण सोहळा *युवा नेते मा. हर्षवर्धन बाबा आत्राम* यांच्या हस्ते पार पडला. त्यांनी खेळाडूंना शुभेच्छा देत ग्रामीण भागातील युवकांनी क्रीडा क्षेत्रात पुढे यावे, तसेच अशा स्पर्धांमुळे युवकांना आपले कौशल्य दाखवण्याची चांगली संधी मिळते, असे मत व्यक्त केले.
या कार्यक्रमाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे तालुका अध्यक्ष *मा. नागेश मडावी, मांड्रा येथील सरपंच विलास मडावी,* सूरज जाधव, आकाश राऊत,तसेच गावातील अनेक मान्यवर, खेळप्रेमी युवक आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खेळाडूंना प्रोत्साहन देत स्पर्धेचा आनंद घेतला.
*जय हनुमान सी.सी. मांड्रा* यांच्या वतीने स्पर्धेचे नियोजन अत्यंत उत्तम प्रकारे करण्यात आले होते. स्पर्धेच्या यशस्वी आयोजनाबद्दल उपस्थित मान्यवरांनी आयोजकांचे कौतुक केले. या स्पर्धेमुळे युवकांमध्ये क्रीडाप्रेम वाढण्यास मदत होत असून ग्रामीण भागात अशा उपक्रमांना प्रोत्साहन मिळत असल्याचे मतही व्यक्त करण्यात आले.

SHARE

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
बातमी कॉपी करण्याचा प्रयत्न करू नका.